Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर आज मतदान, वाराणसीतून नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मैदानात

Lok Sabha Election Phase 7 Voting: आज शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील एकूण 904 उमेदवारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप खासदार रवी किशन, पवन सिंह, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती आणि अभिनेत्री कंगना रणौत आज मतदान करणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2024 | 10:41 AM
शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर आज मतदान, वाराणसीतून नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मैदानात
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीच्या 2024 (Lok Sabha Election) च्या शेवटच्या टप्प्यासाठी आज (1 जून) मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे आज भवितव्य ठरणार आहे.

शेवटच्या टप्प्यात कोणत्या जागांवर मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये बिहारमधील 8, चंदीगडमधील 1, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3, ओडिशातील 6, पंजाबमधील 13, उत्तर प्रदेशमधील 13 आणि पश्चिम बंगालमधील 9 जणांचा समावेश आहे. ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 जागांसाठीच मतदान होणार आहे.

मतदानासाठी नरेंद्र मोदी अनेक दिग्गज उतरणार मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील काही लोकप्रिय उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुराग ठाकूर, चरणजीत सिंह चन्नी, महेंद्र नाथ पांडे, रविशंकर प्रसाद, अभिषेक बॅनर्जी, कंगना रणौत, मनीष तिवारी, मीसा भारती, अनुप्रिया सिंग पटेल, नीरज शेखर, पवन सिंग, रवी किशन, उपेंद्र कुशवाह यांचा समावेश आहे. तर रामकृपाल यादव, हंस राज हंस, हरसिमरत कौर बादल चंदीगडमधून तर मनीष तिवारी चंदीगडमधून निवडणूक लढवत आहेत. यासोबतच सीता सोरेनचाही समावेश आहे.

निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मी या टप्प्यातील सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याची विनंती करतो. मला विश्वास आहे की आमचे तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने पुढे येऊन मतदान करतील. चला तर मग आज एकत्र येऊ या आपल्या लोकशाहीला अधिक चैतन्यशील बनवूया..”

Today is the final phase of the 2024 Lok Sabha elections. As 57 seats across 8 states and UTs go to the polls, calling upon the voters to turnout in large numbers and vote. I hope young and women voters exercise their franchise in record numbers. Together, let’s make our…

— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2024

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नागरिकांना ट्विट करुन मतदान करण्याचे आवाहन केले. “मी सर्व मतदारांना लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अभूतपूर्व मतदान करण्याचे आवाहन करतो. देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी पुन्हा एक मजबूत सरकार निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही असे सरकार बनवा जे देशाला स्वावलंबी बनवण्यासोबतच प्रत्येक देशवासीयात आत्मविश्वास जागृत करू शकेल. विकसित भारतासाठी पूर्ण उत्साहाने मतदान करा आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करा.”

यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. आज मतदान केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, आज माझ्या मूळ गावी विजयपूर येथील माझ्या बूथवर येऊन मतदान करण्याचा मला पहिला बहुमान मिळाला आहे. प्रत्येकाने सशक्त, सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठी मतदान केले पाहिजे. लोकशाही बळकट करा. कृपया विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यात हातभार लावा.

उल्लेखनीय म्हणजे 19 एप्रिलपासून सुरू झालेली ही मतदान प्रक्रिया आज संध्याकाळीच संपणार आहे. यानंतर, आंध्र प्रदेश विधानसभेसह लोकसभेच्या 543 जागांवर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे, तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या म्हणजेच 2 जून रोजी होणार आहे.

Web Title: Lok sabha elections 2024 phase 7 voting 57 seats vote in last leg news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • loksabha election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.