Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी माणसाच्या खांद्यावर राजस्थानची धुरा; हरिभाऊ बागडे बनले नवे राज्यपाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलेले आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2024 | 12:27 PM
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलेले आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्याचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या नव्या आदेशांनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल हे सी. पी. राधाकृष्णन असणार आहे. सी. पी. राधाकृष्णन हे याआधी झारखंडचे राज्यपाल होते. याचबरोबर आता मराठी व्यक्ती राजस्थानची धुरा सांभाळणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.

कोण आहेत हरिभाऊ बागडे?

डोक्यावर गांधी टोपी आणि अगदी साधी राहणीमान असलेले हरिभाऊ बागडे औरंगाबादचे नेते आहे. मातीतून कष्टाने वर आलेले नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे. लहानपणी अगदी पेपर टाकण्याचं काम केलेले हरिभाऊ आता राज्यस्थानचे राज्यपाल झाले आहेत. मागील 65 वर्षांपासून त्यांनी आरएसएसमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर आमदार, मंत्री आणि आता थेट राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे कार्यरत होणार आहेत. बागडे यांनी 1985 ला आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. पाच वेळी त्यांनी सलग आमदार म्हणन काम केले. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड विधानसभा अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून देखील हरिभाऊ बागडे यांनी कार्यभार सांभाळला आहे. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.

काय म्हणाले हरिभाऊ बागडे?

राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आले आहे. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी प्रतिक्रिया दिली. बागडे म्हणाले, काल (27 जुलै) सकाळी 8.45 च्या सुमारास मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. पंतप्रधान मला म्हणाले, हरिभाऊ काय चाललंय? मी त्यांना म्हटलं सर्व काही चांगलं चाललंय, एकंदरीत बरं चाललंय. त्यावर ते मला म्हणाले, तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे. त्यांनी मला इतकंच सांगितलं आणि म्हणाले, ही गोष्ट कोणाला सांगू नका, मी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेन. त्यानंतर काही वेळाने माझी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याची बातमी समोर आली.

Web Title: Maharashtra bjp leader haribhau bagde appointed by the president as the new governor of rajasthan nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार
1

Online Gaming Bill: ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, Dream 11, MPL, Binzo सारख्या ॲप्सवर बंदी येणार

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट
2

महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट

राष्ट्रपतींची पहिली महिला ADC बनली नौदलाची यशस्वी सोलंकी, २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती,
3

राष्ट्रपतींची पहिली महिला ADC बनली नौदलाची यशस्वी सोलंकी, २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती,

Supreme Court: सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती वा राज्यपालांसाठी कालमर्यादा ठरवू शकते का?
4

Supreme Court: सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती वा राज्यपालांसाठी कालमर्यादा ठरवू शकते का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.