
Rahul Gandhi did not wear Assam patka At Home event in Rashtrapati Bhavan
राष्ट्रपती भवन येथे ऐट होम या स्वागत कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह सर्व मान्यवरांना आसामचा पटका परिधान करण्यास सांगण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कार्यक्रमात सर्व पाहुण्यांना आसामी पटाका घालण्याची विनंती केली होती. सर्वांनी हा पटका परिधान देखील केला होता. मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पटका घालणे टाळले. राहुल गांधींनी हा पटका न घातल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रपती भवनाने या खास प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत एरी सिल्कपासून बनवलेल्या शाल (पटके) ने केले, ज्याला सामान्यतः “शांतता सिल्क” असेही म्हणतात. हे सिल्क ईशान्य भारतातील कापड परंपरा आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या वर्षीच्या स्वागत समारंभात ईशान्येकडील राज्यांची संस्कृती, कला आणि पाककृतींवर लक्ष केंद्रित केले गेले. मात्र राहुल गांधींनी हा पटका घालणे टाळले. राष्ट्रपतींनी सांगितल्यानंतर देखील पटका न घातल्यामुळे राहुल गांधींनी राष्ट्रपतींचा अपमान केला असल्याचे बोलले जात आहे. यावरुन भाजप नेत्यांनी राहुल गांधींना घेरले.
हे देखील वाचा : राहुल गांधींना मागे बसवल्याने काँग्रेस संतापली! “अडवाणींना आम्ही सन्मान दिला, मोदींनी शिष्टाचार मोडला”
राहुल गांधी यांनी आसामी पटाका घालण्यास नकार देणे हा संपूर्ण ईशान्येकडील लोकांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे आणि ते अत्यंत असंवेदनशील म्हटले आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राहुल गांधींना दोनदा पटाका घालण्याची आठवण करून दिली होती, परंतु त्यांनी ऐकले नाही. “पंतप्रधानांपासून ते युरोपियन युनियनच्या नेत्यांपर्यंत आणि परदेशी राजदूतांपर्यंत, सर्व पाहुण्यांनी आदर आणि समावेशाचे प्रतीक म्हणून पारंपारिक ईशान्येकडील पटाका परिधान केला होता,” असे मालवीय यांनी ट्विट केले आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की राहुल गांधी यांचे हे वर्तन काँग्रेस पक्षाच्या ईशान्येकडील राज्यांबद्दलच्या सततच्या असंवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे. आसामच्या लोकांकडून बिनशर्त माफी मागण्याची मागणी करत सरमा यांनी लिहिले की, “राहुल गांधी यांचा हा निर्णय आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील लोकांचा अत्यंत अपमानजनक होता. या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या कृतीत त्यांनी पारंपारिक पटाका घालण्यास नकार दिला.”
हे देखील वाचा : कोण आहे २६ वर्षीय सिमरन बाला? तरुणीने पुरुष पथकाची कमान सांभाळून कर्तव्यपथावर रचला इतिहास
काँग्रेसचे पलटवार
काँग्रेसने भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी एका ट्विटमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये ते कार्यक्रमात पटाका घालताना दिसले नाहीत. खेरा यांनी हिमंता सरमा यांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, “तुम्ही राजनाथ सिंह यांच्या वतीने माफी मागाल का? की तुमचे संपूर्ण निवडणूक राजकारण या निरुपयोगी मुद्द्यांमध्ये अडकवायचे आहे?” असा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित केला.