
मोठी बातमी ! जम्मूतील मोठा कट उधळला; 19 वर्षीय संशयित दहशतवादी अटकेत
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच राजधानीत दिल्लीत बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. असे असताना आता जम्मूमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट उधळून लावत पोलिसांनी संशयित दहशतवादी मोहम्मद साजिद (वय १९) याला अटक केली आहे. साजिदला पाकिस्तान आणि इतर देशांमधील त्याच्या सूत्रधारांकडून मोबाईल फोनद्वारे सूचना मिळत होत्या.
पोलिसांनी त्याला अटक केली असून, गुरुवारी त्याला सहा दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. साजिदच्या चौकशीच्या आधारे जम्मूमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, साजिदचे वडील रियासी येथील रहिवासी असून, सीआरपीएफमध्ये आहेत आणि सध्या दिल्लीत तैनात आहेत. असलमचे कुटुंब तीन वर्षांपूर्वी जम्मूतील बथिंडी येथे स्थलांतरित झाले. साजिद तरुणांना कट्टरतावादी बनवण्याचे काम करत असल्याचे समोर आले होते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी त्याला जम्मूतील सुजवान येथील एका चौकीवर अटक केली. दहशतवादी कारवायांशी संबंधित एनएसएच्या कलमांखाली त्याच्याविरुद्ध बहु फोर्ट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Delhi Bomb Blast प्रकरणात मोठी घडामोड; आरोपी जसीर वाणीची न्यायालयात विशेष मागणी, NIAकडून काटेकोर तपास सुरू
दरम्यान, अटक केलेल्या साजिदचे वडील मोहम्मद असलम हे मूळचे रियासी जिल्ह्यातील जेडी पंडाल येथील रहिवासी आहेत. २०११ मध्ये त्यांनी १४ वर्षांपूर्वी गीता नगरमध्ये घर बांधले. संपूर्ण कुटुंब तिथे राहत होते.
साजिद रचत होता मोठा दहशतवादी कट
मोहम्मद साजिद जम्मूमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. तो पाकिस्तान आणि अनेकांशी संपर्कात होता. पोलिसांना सीमेपलीकडून कनेक्शन असल्याचा संशय आहे. याचा तपशीलही शेअर केला. तो कधी आणि कोणती माहिती शेअर करत होता हे ठरवण्यासाठी ते इतर देशांमधील विशिष्ट फोन नंबर तपासत आहेत.
तरुणांना द्यायलाच ऑनलाईन धडे
जम्मूमध्ये दहशतवादी कट रचल्याच्या कारणावरून अटकेत असलेला मोहम्मद साजिद तरुणांना ऑनलाईन कट्टरतावादी बनवत होता. त्याच्या दहशतवादी कटांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी त्याला सहा दिवसांच्या रिमांडवर घेतले. त्याच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी जम्मूमधील अनेक ठिकाणी छापेही टाकले.
हेदेखील वाचा : दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी डॉ. उमरचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आले समोर; थेट तुर्कीमध्ये झाले दहशतवादी ट्रेनिंग?