Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; 195.50 रुपयांनी महागला सिलिंडर

पश्चिम आशियात युद्ध अद्याप सुरुच आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यातच सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांनी वाढ केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 07:33 AM
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल 195.50 रुपयांनी महागला सिलिंडर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल 195.50 रुपयांनी महागला सिलिंडर

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पश्चिम आशियात युद्ध अद्याप सुरुच आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यातच सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ १९ किलोच्या सिलिंडरसाठी आहे. मात्र, सरकारी कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील ही वाढ पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम आहे. नवीन दर लागू झाल्यामुळे, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २०७८.५० झाली आहे. यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी १ मार्च रोजी १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात ११४.५ ने वाढ केली होती. मात्र, सरकारने घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी शेवटची दरवाढ ७ मार्च रोजी ६० ने झाली होती. हा सिलेंडर आता दिल्लीत ९१३ ला उपलब्ध झाला आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विनिमय दरांच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि एलपीजीच्या किमती सुधारित करतात.

जागतिक तेल किमतींमध्ये वाढ

पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने जागतिक तेल किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा परिणाम एलपीजीच्या किमतींवरही होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या तरी स्थिर आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रति लिटर २ ची कपात झाल्यापासून हे दर स्थिर आहेत. दिल्लीत सध्या पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९४.७२ आहे, तर डिझेल प्रति लिटर ८७.६२ ला विकले जात आहे. ही दरवाढ व्यवसाय आणि लहान उद्योगांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते, कारण ऊर्जा खर्चातील वाढीचा त्यांच्यावर थेट परिणाम होणार आहे.

हेदेखील वाचा : AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’

Web Title: Major hike in gas cylinder prices cylinder becomes costlier by 195 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:13 AM

Topics:  

  • Commercial Gas
  • LPG price

संबंधित बातम्या

१ जुलैपासून देशात मोठे बदल! LPG, Petrol आणि Aadhaar Card संबंधी नवीन नियम लागू
1

१ जुलैपासून देशात मोठे बदल! LPG, Petrol आणि Aadhaar Card संबंधी नवीन नियम लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.