Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur Violence: राष्ट्रपती शासन लागताच राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये; बंडखोरांना दिला अल्टिमेटम; म्हणाले, “सात दिवसांत…”

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2025 | 09:55 PM
Manipur Violence: राष्ट्रपती शासन लागताच राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये; बंडखोरांना दिला अल्टिमेटम; म्हणाले, "सात दिवसांत..."

Manipur Violence: राष्ट्रपती शासन लागताच राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये; बंडखोरांना दिला अल्टिमेटम; म्हणाले, "सात दिवसांत..."

Follow Us
Close
Follow Us:

भाजप नेते एन. बिरेन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे.

मणिपूरमध्ये गेल्या 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या तणाव पाहता राज्यपालांनी सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अजय कुमार भल्ला यांनी खास करून युवकांना आवाहन केले आहे. पुढील 7 दिवसांमध्ये जवळच्या पोलिस चौकीत किंवा सुरक्षा दलाच्या छावणीत लुटलेली आणि बेकायदेशीरपणे बाळगलेली शस्त्रे आणि दारुगोळा जमा करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

जर एका आठवड्याच्या आतमध्ये शस्त्रे किंवा दारुगोळा जमा केला तर त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असे राज्यपाल म्हणाले आहेत. मात्र त्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्रसाठा सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, मणिपूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, येथील सरकार भारतीय संविधानातील तरतुदींनुसार काम करू शकत नाही, म्हणून राष्ट्रपती संविधानाच्या कलम ३५६ मध्ये दिलेल्या अधिकारांचा वापर करून मणिपूरचे प्रशासन आपल्या हातात घेत आहे.

दरम्यान, मणिपूर राज्यातील विधानसभेचे शेवटचे अधिवेशन 12 ऑगस्ट 2024 मध्ये पार पडले. यापूर्वी, 9 फेब्रुवारी रोजी बिरेन सिंग यांनी राजधानी इंफाळमध्ये मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले.

हेही वाचा: Manipur News : CRPF जवानाने स्वत:च्या छावणीत केला गोळीबार, 2 जण ठार तर 8 जण जखमी,स्वतःवर ही झाडली गोळी

ऑडिओ टेपवरून गोंधळ

यापूर्वी मणिपूर हिंसाचारात बिरेन सिंगचा सहभाग असल्याचा दावा करणारी एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आली होती. राजीनामा देण्याच्या फक्त 5 दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने या लीक झालेल्या ऑडिओ टेपचा फॉरेन्सिक अहवाल मागितला होता. ऑडिओ टेपमध्ये बिरेन सिंग यांना राज्यात शस्त्रास्त्रांची लूट करण्यास परवानगी दिल्याचे कथितपणे ऐकू येते, त्यानंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

एन. बिरेन सिंग यांच्याविरुद्ध भाजपमध्ये नाराजी

एन. बिरेन सिंग यांच्याविरुद्ध भाजपमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोड्याच वेळात भाजपच्या विधिमंडळ गटाची महत्वाची बैठकही झाली. या बैठकीत विधिमंडळ गटाचा नेता म्हणजेच मणिपूरचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली आहे.

Web Title: Manipur violence presidential rule governor ajay kumar bhalla warn to rebels and gave ultimatum latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

Manipur मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला; 2 जवान शहीद; तातडीने…
1

Manipur मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला; 2 जवान शहीद; तातडीने…

मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; PM मोदींच्या दौऱ्यानंतर चुराचंदपूरमध्ये RAFवर दगडफेक
2

मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; PM मोदींच्या दौऱ्यानंतर चुराचंदपूरमध्ये RAFवर दगडफेक

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान
3

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

रेल्वेच्या नकाशावर आले मिझोराम; PM नरेंद्र मोदींची ऐतिहासिक भेट; तब्बल 9 हजार कोटींच्या…
4

रेल्वेच्या नकाशावर आले मिझोराम; PM नरेंद्र मोदींची ऐतिहासिक भेट; तब्बल 9 हजार कोटींच्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.