CRPF जवानाने स्वत:च्या छावणीत केला गोळीबार, 2 जण ठार तर 8 जण जखमी,स्वतःवर ही झाडली गोळी (फोटो सौजन्य-X)
Manipur CRPF News Marathi : इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामसांग येथील एका छावणीत मणिपूरमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानाने गोळीबार केला. या गोळीबारात त्याचे दोन साथीदार ठार झाले आणि आठ जण जखमी झाले. यानंतर स्वत:ने ही आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामसांग येथील सीआरपीएफच्या छावणीत रात्री ८ वाजताच्या सुमारास एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलमधून गोळीबार केला आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली. मणिपूर पोलिसांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा जवान १२० व्या बटालियनचा होता.
मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल येथे ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी रात्री ८.२० वाजता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) छावणीवर हवालदार संजय कुमार यांनी केलेल्या गोळीबारात एक कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक ठार झाले. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इम्फाळमधील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत (रिम्स) दाखल करण्यात आले आहे. संजय कुमार हे सीआरपीएफच्या १२० व्या बटालियनमध्ये तैनात होते. गोळीबारामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या यावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
In an unfortunate incident, tonight at around 8 pm, a suspected case of fratricide happened inside a CRPF camp in Lamsang under Imphal West District wherein one CRPF jawan opened fire killing 02 (two) of his own CRPF colleagues on the spot and injuring 08 (eight) others. Later,…
— Manipur Police (@manipur_police) February 13, 2025
वरिष्ठ पोलिस आणि सीआरपीएफ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमी सैनिकांना इंफाळ येथील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्था (रिम्स) येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास, एका दुर्दैवी घटनेत, इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामसांग येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये संशयास्पद भ्रातृहत्येचा प्रकार घडला. ज्यामध्ये एका सीआरपीएफ जवानाने त्याच्याच २ सीआरपीएफ सहकाऱ्यांवर गोळीबार केला, ज्यामध्ये ८ जण जखमी झाले. नंतर, त्याने त्याच्या सर्व्हिस रायफलचा वापर करून आत्महत्या केली. हे सैनिक F-120 कॉय CRPF चे होते. वरिष्ठ पोलिस आणि सीआरपीएफ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
आजपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यापूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यांनंतर, भाजपचे ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांनी पक्षाच्या आमदारांशी अनेक वेळा चर्चेचे आयोजन केले आहे, परंतु गतिरोध अजूनही कायम आहे. गेल्या दोन दिवसांत, संबित यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची दोनदा भेट घेतली आहे.