बडोद्यातील IOCL रिफायनरीत भीषण स्फोट; अनेक कामगार अडकले
गुजरातमधील बडोदास्थित इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या रिफायनरीत स्फोट झाला असून त्यानंतर भीषण आग लागली आहे. रिफायनरीत कित्येक कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आतमध्ये किती कर्मचारी अडकलेत याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
Gujarat: Rescue operations underway after blast in IOCL refinery in Koyali
Read @ANI Story | https://t.co/gQaH1EVyPU#Gujarat #RefineryBlast #Koyali #Refinery pic.twitter.com/64SKNJiW6b
— ANI Digital (@ani_digital) November 11, 2024
प्राथमिक माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या रिफायनरीत 1000 किलो लिटर बेंझिन टँकमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. मात्र IOCL च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबद कोणतीही माहिती दिली नाही. IOCL मध्ये आग लागल्याच्या सूचना मिळाल्यानंतर बडोदा कलेक्टर, एसपी आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तत्काळ IOCL च्या फायर सेफ्टी टीम आणि वडोदरा फायर ब्रिगेडने आग विझवण्याचे कार्य सुरू केले आहे. त्याचबरोबर रिफायनरीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) ची ही रिफायनरी बडोदा शहराच्या कोयली भागात स्थित आहे. आग इतकी भयंकर आहे की कित्येक किलोमिटरवरून धुराचे लोट दिसत होते. बडोदा जिल्हा कलेक्टर बिजल शाह यांनी सांगितले की, रिफायनरीत सुमारे चार वाजता स्फोट झाला. कोयली भागातील IOCL रिफायनरी ही भारत सरकारचा उपक्रम आहे. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. आमची पहिली प्राथमिकता आग विझवणे आणि कर्मचार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आहे.
हेही वाचा-Manipur Attack : मणिपूरमध्ये उग्रवाद्यांचा CRPF कॅम्प, पोलीस ठाण्यावर हल्ला; घरं पेटवली, ११ ठार
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज जवळपास चारच्या दरम्यान डियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या रिफायनरीत स्फोट झाला. 1000 किलो लिटर बेंझिन टँकमध्ये हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे आग रिफायनरीच्या इतर भागातही पसरली. रिफायनरीत काही कामगार काम करत होते. ते या आगीत सापडल्याची भीती व्यक्त होत आहे. काही कामगार प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याची माहिती आहे.
स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या भागात हादरे जाणवले. शिवाय नंतर लागलेल्या आगीचे लोट कित्येक किलोमिरटवरून दिसतं होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्या देखिल घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. बडोद्याचे जिल्हाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. मात्र किती कामगार कंपनीत काम करत होते याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.