Top Marathi News Today : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य
21 Aug 2025 01:25 PM (IST)
गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आला आहे. अशा स्थितीत एका आरोग्यसेविकेची प्रकृती गंभीर झाली. याची माहिती होताच त्यांना हेलिकॉप्टर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी एका आजारी आराग्यसेविकेसाठी दाखवलेली तत्परता पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन घडवणारी ठरली.
21 Aug 2025 01:15 PM (IST)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते मॉस्कोमध्ये २६ व्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) बैठकीसाठीत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे समकक्ष आणि उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह याच्यासोबत सह-अध्यक्षपद भूषवले.या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियातील (India Russia Relations) व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक भागीदारीवर चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही देशांमध्ये शेती, उर्जा, उद्योग, कौशल्य विकास, गतिशीलता, शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला.
21 Aug 2025 01:05 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर भेट दिली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
21 Aug 2025 12:50 PM (IST)
संगमनेर मध्ये किर्तनकार बापू भंडारे यांच्याविरोधात थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत. थोरात समर्थकांनी मोर्चा काढला आहे. त्यात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे काही नेते सहभागी झाले आहेत. गृह खात्याचा अशा प्रवृत्तीला पाठिंबा असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
21 Aug 2025 12:44 PM (IST)
जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील सांबा जिल्ह्यातील जटवाल भागात एक खाजगी बस खड्ड्यात कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
21 Aug 2025 12:35 PM (IST)
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कबुतराच्या मुद्यावरुन जैन समाजाला कानपिचक्या दिल्या आहेत. माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण काय करतो, नाय नाय, गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
21 Aug 2025 12:15 PM (IST)
“अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचं आहे. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे. काय होणार आहे धारावीत. कोणते रस्ते होणार आहे. पुण्यासारखी परिस्थिती आहे. पुण्यात जाऊन बघा. थायलंडला जाऊन बघा. फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला वाहने नियंत्रित कराव्या लागतील,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलंय.
21 Aug 2025 12:10 PM (IST)
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रेरणा स्थळ येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.
#WATCH | INDIA alliance Vice-Presidential nominee, former Supreme Court Judge B Sudershan Reddy pays tribute to Mahatma Gandhi at Prerna Sthal, ahead of filing nomination)
(Video: Congress MP) pic.twitter.com/D6BgGfLUsO
— ANI (@ANI) August 21, 2025
21 Aug 2025 11:55 AM (IST)
त्तेशी पंगा घेतला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, तरीही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांवर आवाज उठवत असल्याबद्दल अनेक हितचिंतक काळजीच्या स्वरात बोलतात. पण सामान्य आणि गरीबांच्या कल्याणकारी योजनांचा पैसा डोळ्यांदेखत हडप केला जात असेल तर आमच्या नेत्यांसह आम्ही सत्तेशी कदापि तडजोड करणार नाही आणि शांतही बसणार नाही. निवडणुकीत विरोधकांनी सत्तेची पूर्ण ताकद लावूनही मी निवडून आलो तो जनतेचा आवाज म्हणून लढण्यासाठीच… म्हणून सामान्य माणसासाठी कायमच लढत राहणार..! शेवटी, #मराठी_माणूस कधीही दिल्लीपुढं झुकत नाही….!, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
21 Aug 2025 11:47 AM (IST)
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे. राज्यात घरोघर गणपती येतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
21 Aug 2025 11:30 AM (IST)
मनसेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिलेआहे की "मुंबईकरांनी भाजपला नाकारले! मुंबईत बॅलेट पेपरवर काल दोन निवडणुका झाल्या. पोर्ट ट्रस्टमधे १५ पैकी ११ जागा ठाकरेंना मिळाल्या. तर बेस्ट पतपेढीच्या २१ पैकी १४ जागा इतरांना मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचा बॅलेट पेपरवर दोन्ही ठिकाणी पराभव झाला आहे. मग भाजपाला आसुरी आनंद कशाचा झाला आहे?"
21 Aug 2025 11:20 AM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची अचानकपणे भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
21 Aug 2025 11:12 AM (IST)
मे २०२५ मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अनेक तळ उद्ध्वस्त झाली. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतीचे सावट पसरवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेला या कारवाईत मोठा फटका बसला होता. मात्र, आता या संघटनेने पुन्हा डोके वर काढण्याची तयारी सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, जैश प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल सैफ यांनी पाकिस्तानभरात तब्बल ३१३ नवीन दहशतवादी तळ (मरकझ) उभारण्याची योजना आखली आहे.ॉ
21 Aug 2025 10:44 AM (IST)
२० ऑगस्ट रोजी टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडला गेला. इंग्लंड संघाचा अनुभवी खेळाडू जेम्स विन्सने द हंड्रेडमध्ये खेळताना एक नवा इतिहास रचला. जेम्स विन्स आता टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
21 Aug 2025 10:31 AM (IST)
बुधवारी भारतात Lava Play Ultra 5G लाँच करण्यात आला. हा लावा इंटरनॅशनलचा नवीन 5जी स्मार्टफोन आहे. यात MediaTek Dimensity 7300 चिपसेट आहे, जो 8 जीबी पर्यंत रॅमसह जोडलेला आहे. हा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो आणि 6.67 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. लावा प्ले अल्ट्रा 5जीमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. हँडसेट 5000 mAh बॅटरीसह येतो, ज्यामध्ये 33 वॉट चार्जिंग सपोर्ट आहे
21 Aug 2025 10:15 AM (IST)
अमेरिका–रशिया संबंध गेल्या काही वर्षांपासून जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले असून त्याचा प्रभाव केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर राजनैतिक हालचालींवरही उमटताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर अलास्कामध्ये नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ऐतिहासिक भेट झाली. परंतु या भेटीनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बातमी सविस्तर वाचा...
21 Aug 2025 10:05 AM (IST)
विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज म्हणजेच गुरुवारी सकाळी ११:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि रामगोपाल यादव यांच्यासह इंडिया ब्लॉकचे अनेक नेते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. ८० विरोधी खासदारांनी प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सोनिया गांधी यांचेही नाव यात समाविष्ट आहे
21 Aug 2025 10:04 AM (IST)
BHANDARA | गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदी पात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता साध्यस्तीत सुरु असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली असून धरणाचे सर्वच्या सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले. ३३ पैकी २ दरवाजे १ मिटरने तर ३१ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आली आहे. धरणातून १ लाख ४१ हजार ८५९ क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
21 Aug 2025 09:55 AM (IST)
जून २०२३ मध्ये, बीसीसीआयने अजित आगरकर यांना टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता बनवले. तेव्हापासून त्यांनी अनेक वेळा अशा उत्कृष्ट संघाची निवड केली आहे, ज्याने २ आयसीसी ट्रॉफी देखील जिंकल्या आहेत. आता बीसीसीआयने आगरकरला एक मोठी भेट दिली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, “बीसीसीआयने अजित आगरकरचा करार २०२६ पर्यंत वाढवला आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपवला आणि कसोटी आणि टी२० मध्ये चांगला बदल पाहिला. आगरकरनेही बीसीसीआयची ही ऑफर स्वीकारली आहे असे वृतांच्या माहितीनुसार सांगितले जात आहे.
21 Aug 2025 09:54 AM (IST)
विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज म्हणजेच गुरुवारी सकाळी ११:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि रामगोपाल यादव यांच्यासह इंडिया ब्लॉकचे अनेक नेते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर
21 Aug 2025 09:45 AM (IST)
प्रेमाचा प्रवास सुरु करायचा तर प्रेम व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. हा गोड क्षण अनेकजण कॅमेरात कैद करून ठेवतात जेणेकरून या क्षणाच्या आठवणी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहतील. अनेकजण हा क्षण सोशल मीडियावर देखील शेअर करतात. अशात नुकताच एका सुंदर आणि निसर्गमय प्रपोजलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात व्यक्तीने आपल्या प्रेयसीला प्रोपोज करताच निसर्गाचा असा अद्भुत चमत्कार दिसून आला की हा गोड क्षण आणखीनच अविस्मरणीय ठरला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
21 Aug 2025 09:35 AM (IST)
भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी फक्त १० दहशतवाद्यांनी मुंबईवर रक्तरंजित हल्ला केला. या भीषण कारवाईत १६६ निरपराध नागरिकांचा जीव गेला आणि शेकडो लोक गंभीर जखमी झाले. ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, नरीमन हाऊस अशा प्रमुख ठिकाणांवर दहशतवादी थैमान घालून बसले होते. तीन दिवसांनी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा पूर्णपणे खात्मा केला.
21 Aug 2025 09:30 AM (IST)
बीसीसीआय शुभमन गिलऐवजी श्रेयस अय्यरला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. तथापि, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अय्यरसाठी हे वर्ष खूप चांगले होते. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज देखील होता. ज्यामध्ये त्याने २४३ धावा केल्या. ज्यामुळे त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा दावा मजबूत केला. अय्यर हा टीम इंडियाचा मधल्या फळीतील सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे.
21 Aug 2025 09:27 AM (IST)
गणेशोत्सवासाठी मूर्तीचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.
21 Aug 2025 09:25 AM (IST)
सध्या नवी मुंबई पनवेल उलवेतील बिवलकर कुटुंबियांना दिलेल्या जमिनीचा वाद चिघळला आहे. याविषयी एका सामाजिक संघटनेने पत्रकार परिषद घेत ५० हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप बिवलकर कुटुंबीय तसेच सिडकोवर केले होते. तर बुधवारी खुद्द आमदार रोहित पवार यांनी देखील सिडकोवर मोर्चा काढत सिडको एमडी याना निवेदन देत जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप केले. गेले काही दिवस सुरू असलेल्या या आरोपांवर परदेशात असलेल्या यशवंत बिवलकर यांनी याबाबतचा खुलासा करणारा व्हिडिओ जारी करत हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच संबंधित जमिनीबाबत त्यांनी माहिती दिली. यासह आमच्याबद्दलचा खोटा इतिहास सांगत आमच्या बिवलकर कुर्बियांची बदनामी केली जात असल्याचा आरोप विरोधकांवर केला.
21 Aug 2025 09:15 AM (IST)
आता द ग्रेट इंडियन कपिल सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कीकु शारदा आणि कृष्णा अभिषेक हे दोघेही शोचा सराव करताना भांडताना दिसत आहे. या दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झालेला पाहायला मिळत आहे त्यांच्या अवतीभवती अनेक लोक उभे आहेत. हा प्रँक आहे की खरं भांडण आहे या संदर्भात अजून पर्यंत सत्य बाहेर आलेले नाही. या व्हिडिओच्या खाली अनेक प्रेक्षकांनी लिहिले आहे की हे स्क्रिप्टेड असेल कारण या आधी देखील असे झालेले आहे.
21 Aug 2025 09:13 AM (IST)
महाराष्ट्रातील लातूर येथे तालुका दंडाधिकारी (तहसीलदार) प्रशांत थोरात यांच्या बदलीबद्दल निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सरकारी नियमांचे बंधन आणि शिस्त विसरून प्रशांत सरकारी खुर्चीवर बसले आणि अमिताभ बच्चन यांच्या जुन्या चित्रपट ‘याराना’ मधील ‘यारा तेरी यारी को’ हे गाणे मोठ्या उत्साहात गायला लागले. तिथे उपस्थित असलेले लोकही टाळ्या वाजवू लागले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
21 Aug 2025 09:08 AM (IST)
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच या पावसात अनेक दुर्घटनाही घडत आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे शेतात झोपलेल्या मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
Marathi Breaking News Live Updates : आता भारताची ताकद आणखी वाढणार आहे. कारण, अग्नि-5 या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. ओडिशातील चांदीपूर येथून अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या नव्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारताने आपली संरक्षण क्षमता आणखी मजबूत केली आहे.
अग्नि-5 हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटरपर्यंत अचूकपणे लक्ष्य करू शकते आणि त्यात MIRV तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे एकच क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. ज्या गोष्टीची पाकिस्तानच्या मनात धडकी बसली होती, अखेर ते भारताने करून दाखवले. भारताने बुधवारी मध्यम अंतराची बॅलेस्टिक मिसाईल अग्नि-5ची यशस्वी चाचणी केली आहे.
ओडिशातील चांदिपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज केंद्रात ही चाचणी झाली. पाकिस्तानमध्ये या मिसाईलची इतकी धडकी आहे की, चाचणीच्या एक दिवसाआधी इस्लामाबादच्या थिंक टँकने अग्नि-5 बाबत पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला होता.