Cruiser Admiral Nakhimov Tests : मॉस्को : एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियाने ॲडमिरल नाखिमोव युद्धनौकेवर लढाऊ विमानांची चाचणी सुरु केली आहे. गेल्या २८ वर्षानंतर रशियाने व्हाइट सीमध्ये किरोव्ह श्रेणीतील युद्धनौका उतरवली आहे. ही युद्धनौका जगातील सर्वात ताकदवर युद्धनौकापैकी एक मानली जाते. सध्या याच्या विविध चाचण्या सुरु आहेत. सध्या रशिया आपली हवाई आणि समुद्री ताकद वाढवण्यात व्यस्त आहे.
या युद्धनौकेचे वजन २८ हजार टन आहे. यामध्ये S-400 जमिनीवर वापरली जाणारी संरक्षण प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे रशियाची हवाई आणि समुद्री ताकद प्रचंड वाढली आहे. तसेच या युद्धनौकेवर तीन बाटालियन क्षमतेचेचे शस्त्रही तैनात करण्यात आले आहेत.
मिलिटरी वॉच मासिकेने दिलेल्या अहवालानुसार, या युद्धनौकेवर ८० क्रूझ क्षेपणास्त्र तैनात करण्यात आली आहे. यामध्ये 3M14T कालिब्र यांसारखे धोकादायक क्षेपणास्त्रे आहेत. या क्षेपणास्त्रांचा मारा २५०० किमीपर्यंत अचूकतेने करता येतो. तसेच या युद्धनौकेवर नवीन झिरकॉन हायपरसॉनिक मिसाईल्स देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
या हापरसॉनिक मिसाईल्सचा वेग ९ मॅक पर्यंत आहे. यामुळे ही युद्धनौका रशियासाठी गेम चेंजर ठरण्यार आहे. यामुळे समुद्री मार्ग आणि हवाई मार्गे जरी शत्रूंनी हल्ला केला, तरी त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास रशिया सक्षम आहे.