MP Kangana Ranaut Reaction on Jaya Bachchan Parliament angry on fan viral video
Kangana Ranaut on Jaya Bachchan : नवी दिल्ली : बॉलीवुडच्या एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आणि आता संसद गाजवणाऱ्या खासदार जया बच्चन या नेहमी चर्चेत असतात. खासदार जया बच्चन या अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ काढणाऱ्यावर राग काढताना दिसून आल्या आहेत. नुकताच त्यांचा संसदेच्या आवारातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यावरुन त्यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. यावर आता बॉलीवुड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या फोटोसाठी आलेल्या फॅन्सवर किंवा त्यांचे फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकताना दिसून येतात. यामुळे त्यांना अनेकदा नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. जया बच्चन यांचा हा रुद्रावतार अनेकदा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यावेळी देखील संसदेच्या आवारामध्ये फोटोसाठी आलेल्या तरुणांवर भडकलेल्या जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये जया बच्चन सदर व्यक्तीला ढकलून देखील देत आहेत. यावरुन आता वाद निर्माण झाला असून यामध्ये कंगना राणौत हिने उडी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बॉलीवुड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना राणौत हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणौत हिने लिहिले आहे की, सर्वात जास्त बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात, कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुयासारखी दिसतेय. त्या स्वतः कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही…” अशा कडक शब्दांत खासदार कंगना राणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रनौतची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी देखील अनेकदा जया बच्चन या भडकलेल्या दिसून आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे मिम्स देखील व्हायरल होत असतात. जून महिन्यात दिग्दर्शक रोनो मुखर्जी यांच्या प्रार्थनासभेतही जया बच्चन पापाराझींवर चिडताना दिसल्या होत्या. प्रार्थनासभेनंतर जेव्हा त्या कारमध्ये बसायला जातात तेव्हा त्या पापाराझींना म्हणतात, “चला तुम्हीपण सोबत चला..या.” इतकंच नव्हे तर “बकवास सगळं, घाणेरडे सर्वजण घाणेरडे” अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला होता. त्यांचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा जया बच्चन यांचा संसदेमधील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.