Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हिंदूंमध्ये दोन किंवा तीन लग्न म्हणजे गुन्हा नाही…; तेजच्या ‘प्रताप’ला त्यांच्याच पक्षातील खासदाराचे खुले समर्थन

लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रतापला पक्षातून आणि कुटुंबातून बेदखल केले आहे. यानंतर आता त्यांच्याच पक्षातील खासदार सुधाकर सिंह यांनी बाजू मांडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 03, 2025 | 11:25 AM
MP Sudhakar Singh takes side of Lalu Prasad Yadav son Tej Pratap Bihar politics

MP Sudhakar Singh takes side of Lalu Prasad Yadav son Tej Pratap Bihar politics

Follow Us
Close
Follow Us:

पटना : मागील आठवड्यापासून लालू प्रसाद यादव आणि तेज प्रताप यादव या पिता-पुत्राची जोडी चर्चेत आहे. तेज प्रताप यादव यांची पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी करण्यात आली. प्रेयसीसोबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे तेज प्रताप यादवला पक्ष आणि कुटुंबातून बेदखल करण्यात आले. लालू प्रसाद यादव यांनी घेतलेला या निर्णयाची चर्चा फक्त बिहारच्या राजकारणामध्ये नाही तर देशभरामध्ये आहे. यानंतर आता तेज प्रताप यांना राष्ट्रीय जनता दल पक्षातील खासदारांनी पाठिंबा दिला आहे.

बेजबाबदार वर्तन आणि सामाजिक मुल्ये न जपल्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला पक्षातून आणि कुटुंबातून काढून टाकले. यामुळे तेज प्रताप यादव हे जोरदार चर्चेत आले आहेत. लग्न झालेले असताना 12 वर्षे गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली तेज प्रतापने सोशल मीडियावर दिली. यानंतर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडिया पोस्ट करुन तेज प्रतापने आई-वडिलांची माफी मागत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता खासदार सुधाकर सिंह यांनी तेज प्रतापची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये तीन ते चार विवाह करणे स्वीकारले जाते असे वक्तव्य केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय म्हणाले सुधाकर सिंह?

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह म्हणाले की, “लग्न ही वैयक्तिक बाब आहे, पण मी ती गुन्हा मानत नाही… आम्ही राम मनोहर लोहिया यांच्या पावलावर पाऊल ठेवतो, ज्यांनी सप्त क्रांतीवरील त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की बलात्कार आणि फसवणूक वगळता पुरुष आणि स्त्रीमधील सर्व संबंध वैध आहेत. जर तेज प्रताप यांनी पुन्हा लग्न केले असेल, तर मी ते अनैतिक कृत्य मानत नाही… हिंदू परंपरेत, दोन किंवा तीन ते चार लग्न स्वीकारली गेली आहेत आणि आपण अशा प्रकरणांबद्दल ऐकले आहे. आजही असे अनेक विवाह होतात”, असे विधान सुधाकर सिंह यांनी केल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) दिवंगत प्रमुख रामविलास पासवान यांच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख करत खासदार सुधाकर सिंह उदाहरण दिले. ते म्हणाले की,  “उदाहरणार्थ चिराग पासवान यांचे घ्या. ते रामविलास पासवान यांच्या दुसऱ्या पत्नीच्या पोटी जन्माला आले होते. अनेकांनी दोन किंवा तीन लग्ने केली आहेत, हे सर्वांना माहिती आहे. ही मोठी गोष्ट नाही आणि गुन्हाही नाही. वडील म्हणून लालू प्रसाद यांनी त्यांना स्वीकारले पाहिजे.” असे खासदार सुधाकर सिंह म्हणाले आहेत.

तेज प्रतापची भावनिक साद

तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन लालू प्रसाद यादव यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले की, “माझ्या प्रिय आई आणि बाबा….माझं सगळं जग फक्त तुम्हा दोघांमध्येच आहे. तुम्ही आणि तुम्ही दिलेला कोणताही आदेश देवापेक्षा श्रेष्ठ आहात. जर तू तिथे असशील तर माझ्याकडे सगळं आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम हवे आहे आणि दुसरे काही नाही. बाबा, जर तुम्ही नसता तर ना हा पक्ष असता ना जयचंद सारखे काही लोभी लोक जे माझ्यासोबत राजकारण करतात. फक्त आई आणि बाबा, तुम्ही दोघेही नेहमी निरोगी आणि आनंदी राहा,” अशा शब्दांत तेज प्रताप यादव यांनी आई वडिलांना साद घालण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Mp sudhakar singh takes side of lalu prasad yadav son tej pratap bihar politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • Bihar Politics
  • Lalu Prasad yadav

संबंधित बातम्या

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार
1

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार

Bihar Politics: निवडणुकीआधीचं बिहारच वातावरण तापलं; तेजस्वी यादवांची सरकारवर टीका; म्हणाले…
2

Bihar Politics: निवडणुकीआधीचं बिहारच वातावरण तापलं; तेजस्वी यादवांची सरकारवर टीका; म्हणाले…

Tej Pratap Yadav:  मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार
3

Tej Pratap Yadav: मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार

Bihar Politics: सॅनिटरी पॅडवरील राहुल गांधींच्या फोटो, भाजप आक्रमक;  नेमकं काय आहे हा प्रकार?
4

Bihar Politics: सॅनिटरी पॅडवरील राहुल गांधींच्या फोटो, भाजप आक्रमक; नेमकं काय आहे हा प्रकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.