Vaishnavi Hagawane case Update: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. १६ मे रोजी वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली होती. वैष्णवीने ज्या साडीने गळफास घेतला होता, ती साडी आणि फॅन फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत. वैष्णवीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या दृष्टीने तपास कऱण्यासाठी हा फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून वैष्णवीने गेल्या महिन्यात १६ मे रोजी आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणी तिचा नवरा शशांक हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे,दीर सुशील हगवणे आणि सहआरोपी निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची चौकशीही सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे वैष्णवीने ज्या पंख्याला गळफास घेतला तो पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. हा पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो, का याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
ACB summons to Anjali Damania: राजकारण तापणार! अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं समन्स
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने जीवन संपवलं पण ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे, पोलिसांनी सर्वच बाजूनी तपास सुरू केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात तिचे वजन ७१ किलो असल्याचे नोंदवण्यात आले होते. पण ज्या पंख्याला तिने गळफास घेतला तो पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का, हे तपासण्यासाठी साडी आणि पंख्याचीही तपासणी केली जाणार आहे. त्याचवेळी या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणचा जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाईल देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले अडचणीत वाढ; कासले विरोधात भाजपची आयटी सेल सक्रीय, आणखी एक
निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी तो जप्त केला होता. पण तो लॅपटॉप माझा नसल्याचे दावा चव्हाणने केला आहे. तो लॅपटॉपही पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर या सर्व प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.
राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा शशांक हगवणे आणि नीलेश चव्हाण यांची पोलिस कोठडी आज (मंगळवार) संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकरणाच्या तपासासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी पोलिस त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत. वैष्णवी प्रकरणात तिचे पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्याविरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील चौकशीसाठी दोघांना पोलिस कोठडीत घेण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर आज (मंगळवार) महाळुंगे पोलिस त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.