Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रधानमंत्री मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ कलमी कार्यक्रम राबवणार, राज्य सरकारची घोषणा

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 17, 2023 | 05:00 PM
In the process of launching the same product again and again... PM Modi said, Congress's shop is in danger of being locked.

In the process of launching the same product again and again... PM Modi said, Congress's shop is in danger of being locked.

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. तर पंतप्रधान विश्वकर्मा योजनाही सुरू करण्यात आली. यासोबत महाराष्ट्रातही विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या वाढदिवसाच औचित्य सोधून राज्य सरकारनंही नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.

[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 73 वाढदिवस! देशभरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, विविध कार्यक्रमांच आयोजन https://www.navarashtra.com/india/many-political-leaders-wishing-to-pm-narendra-modi-on-his-73-birthday-today-nrps-458879.html”]

काय आहे नमो ११ कलमी कार्यक्रम?

राज्य सरकारच्या या नमो ११ कलमी कार्यक्रमात महिला, मजूर, शेतकरी, दिव्यांग, शिक्षण या क्षेत्रावर विषेश भर देण्यात आला आहे.

कायक्रमात विविध योजना

महिलांना शासकीय योजनेचा लाभ : चाळीस लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडणे. 20 लाख महिलांना शक्ती गट जोडणी. पाच लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण देणे. पाच लाख महिलांना उद्योग उभारण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे. तीन लाख महिलांना बाजारपेठ आणि ग्राहक उपलब्ध करून देणे

नमो कामगार कल्याण अभियान : 73 हजार बांधवांना कामगारांना सुरक्षा संच देणे भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान

नमो शेततळी अभियान : शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढवणे. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणे मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारणे

नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान : आत्मनिर्भर गाव विकसित करणे. शंभर टक्के बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधून देणे. तसेच 100 टक्के घरामध्ये शौचालय बांधून त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे. 100 टक्के पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे. शंभर टक्के गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे. 100 टक्के महिलांना सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे. पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनवणे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन आणि सहाय्य, ऑरगॅनिक उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ, ऑरगॅनिक उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, ऑरगॅनिक उत्पादन प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, 73 यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव.

नमो ग्रामसचिवाले अभियान : प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायती कार्यालयाचे बांधकाम करणे. 73 गावामध्ये ग्रामसचिवाय उभारणे. सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे. पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर होईल यासाठी नियोजन करणे. वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे. संपूर्ण गावाचे नियंत्रण कक्ष उभारणे.

नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान : 73 आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी, सुधारणा करणे आणि 73 विज्ञान केंद्र उभारणे. अत्याधुनिक संसाधने असणारी शाळा उभा करणे. वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण देणे. अंतराळ विषयक मार्गदर्शन. विज्ञानातील महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन. महत्त्वाच्या शोधांबाबत माहिती. ए आय बाबत प्रशिक्षण. वर्ग सायन्सला टेलिस्कोप आणि डिजिटल बॉलद्वारे अंतराळ दर्शन

नमो दिव्यांग शक्ती अभियान : 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणे : अभियान स्वरूपात दिव्यांगांचे सर्वेक्षण आणि ओळख निश्चित करणे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र परिवहन आणि रेल्वे पास आणि दिव्यांग यांना असलेल्या इतर सुविधा उपलब्ध करून देणे. दिव्यांगांना अवश्य साहित्य उपलब्ध करून देणे. दिव्यांगा करता राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देणे. दिव्यांग्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे. दिव्यांगाने व्यावसायिक उभारणीसाठी भांडवल आणि कर्ज उपलब्ध करून देणे. दिव्यांगांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे

नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान : 73 क्रीडा संकुल उभारणे. सुसज्य क्रीडा मैदाने आणि उद्यान उभारणे. मैदानी क्रीडा सुविधा देणे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुविधा देणे. खेळाडू समुपदेशन आणि सक्षमीकरण करणे.

नमो शहर सौंदर्य करण अभियान : 73 ठिकाणी शहर सौंदर्यकरण प्रकल्प राबवणे. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे तलाव रस्ते पदपथ दुभाजक चौकशा सार्वजनिक ठिकाणचे सौंदर्यकरण करणे. लोकसहभागाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण टिकून राहावे यासाठी प्रयत्न करणे.

नमो तीर्थस्थळे व गडकिल्ले संरक्षण कार्यक्रम : 73 पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करणे. ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार प्राथमिक सुविधा उपलब्ध डिजिटल दर्शन परिसर सुशोभीकरण आणि स्वच्छता

नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान : 73 गरीब व मागासवर्गीय वस्त्यांना सर्वांगीण विकास करणे: पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीय यांना पक्के घरे बांधून देणे. 100 टक्के पक्के रस्ते उभारणे. 100 टक्के घरांमध्ये वीजपुरवठा करणे. समाज मंदिर उभारणे त्यातून समाज प्रबोधनाचे काम होईल यासाठी प्रयत्न करणे.

Web Title: Namo 11 point program started in maharashtra on the occasion of prime minister modis 73rd birthday nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2023 | 04:06 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • political leaders

संबंधित बातम्या

15 August Modi Speech : PM नरेंद्र मोदींची तरुणांसाठी ऐतिहासिक घोषणा; ‘विकसित भारत रोजगार’ योजनेअंतर्गत मिळणार 15 हजार
1

15 August Modi Speech : PM नरेंद्र मोदींची तरुणांसाठी ऐतिहासिक घोषणा; ‘विकसित भारत रोजगार’ योजनेअंतर्गत मिळणार 15 हजार

Independence Day Modi Speech : भारताची ताकद आकाशात झेपावेल! लाल किल्ल्यावरून PM मोदींचे तरुणांना स्फूर्तीदायी आवाहन
2

Independence Day Modi Speech : भारताची ताकद आकाशात झेपावेल! लाल किल्ल्यावरून PM मोदींचे तरुणांना स्फूर्तीदायी आवाहन

Independence Day 2025 : अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ठणकावून सांगितलं
3

Independence Day 2025 : अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ठणकावून सांगितलं

Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा
4

Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.