Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Modi : 4.2 कोटी एलईडींचा अद्भुत नजारा! भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगण ‘कॉसमॉस म्हैसूरु प्लॅनेटेरियम’चे उद्घाटन. 4.2 कोटी एलईडी आणि 15 मीटरच्या घुमटामुळे खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव मिळणार.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 13, 2026 | 06:52 PM
Narendra Modi : 4.2 कोटी एलईडींचा अद्भुत नजारा! भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Narendra Modi : 4.2 कोटी एलईडींचा अद्भुत नजारा! भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधानांची स्काय थिएटरला भेट
  • 4.2 कोटी एलईडीचा वापर
  • कार्यक्रम कन्नड, इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध
 

Narendra Modi : भारतातील पहिले एलईडी डोम तारांगण असलेल्या ‘कॉसमॉस म्हैसूरु प्लॅनेटेरियम’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यपाल सुधा यादव, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, म्हैसूर-कोडगूचे भाजप खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोदी म्हणाले की, खगोलशास्त्राचे शिक्षण आणि तारांगण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या तारांगणामुळे प्रेक्षकांना अवकाशाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IIA) या संस्थेने या अत्याधुनिक तारांगणाची उभारणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर फीत कापून या केंद्राचे उद्घाटन केले.

पंतप्रधानांची स्काय थिएटरला भेट

उद्घाटनानंतर निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मोदी यांना तारांगणाची वैशिष्ट्ये समजावून सांगितली. त्यांनी संपूर्ण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी ‘स्काय थिएटर’ला भेट दिली. तेथे इतर मान्यवरांसोबत त्यांनी खगोलशास्त्रावर आधारित कार्यक्रमही पाहिला. यावेळी त्यांनी लडाखमधून आलेले तज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळ वैज्ञानिकांशी संवाद साधला.

4.2 कोटी एलईडीचा वापर

चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी म्हैसूर विद्यापीठाच्या परिसरात ‘कॉसमॉस म्हैसूरु’ उभारण्यात आले आहे. खगोलशास्त्राचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून या सुविधेची संकल्पना मांडण्यात आली आहे. या तारांगणात 15 मीटरचा तिरपा घुमट असून, त्यामध्ये सुमारे 6,150 पॅनल्स बसवण्यात आले आहेत. या पॅनल्समध्ये एकूण 4.2 कोटी एलईडींचा वापर करण्यात आला आहे.

पारंपरिक तारांगणांपेक्षा या केंद्राचे तंत्रज्ञान वेगळे आहे. येथील एलईडी पॅनल्स रिअल टाइममध्ये नियंत्रित करता येतात. त्यामुळे आकाशातील दृश्ये अधिक प्रभावीपणे सादर करता येणार आहेत. खगोलशास्त्राचे शिक्षण अधिक रंजक आणि अनुभवाधारित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

कार्यक्रम कन्नड, इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध

‘स्काय थिएटर’मध्ये व्यावसायिक पद्धतीने तयार केलेले खगोलशास्त्रविषयक कार्यक्रम दाखवले जाणार आहेत. याशिवाय म्हैसूरचा इतिहास आणि खगोलशास्त्र यांच्यातील संबंध उलगडणारा चित्रपटही येथे प्रदर्शित केला जाणार आहे. हे कार्यक्रम कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असतील.

या केंद्रात प्रदर्शन दालन, खगोलशास्त्राशी संबंधित प्रतिकृती आणि कलाकृती असलेले संग्रहालय, व्याख्यान सभागृह, प्रशिक्षण केंद्र तसेच परस्परसंवादी बाह्य प्रदर्शनाची सुविधाही उपलब्ध असेल.

‘कॉसमॉस म्हैसूरु’च्या माध्यमातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या संशोधन कार्यालाही मदत मिळणार आहे. देशभरातील आणि अंतराळातील मल्टिव्हेव्हलेंथ टेलिस्कोप सुविधांचे संचालन, भविष्यातील खगोलीय सुविधांचा विकास आणि राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती कार्यक्रमांना या केंद्राचा उपयोग होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे नाव काय आहे?

    Ans: ‘कॉसमॉस म्हैसूरु प्लॅनेटेरियम’ हे भारतातील पहिले एलईडी डोम तारांगण आहे.

  • Que: हे तारांगण कुठे उभारण्यात आले आहे?

    Ans: कर्नाटकातील म्हैसूर शहरात चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी म्हैसूर विद्यापीठाच्या परिसरात हे तारांगण उभारण्यात आले आहे.

  • Que: स्काय थिएटरमध्ये कोणते कार्यक्रम दाखवले जाणार आहेत?

    Ans: येथे खगोलशास्त्रावर आधारित कार्यक्रम आणि म्हैसूरचा इतिहास व खगोलशास्त्र यांच्यातील संबंध सांगणारा चित्रपट दाखवला जाणार आहे.

Web Title: India first led dome planetarium cosmos mysuru inaugurated by narendra modi rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • dk shivkumar
  • Ladakh
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर
1

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

QUAD Summit 2026: मनिलामध्ये मोदी-ट्रम्प जोडी चीनला दाखवणार आरसा; एकाच दौऱ्यात साध्य करणार दोन प्रमुख उद्दिष्टे
2

QUAD Summit 2026: मनिलामध्ये मोदी-ट्रम्प जोडी चीनला दाखवणार आरसा; एकाच दौऱ्यात साध्य करणार दोन प्रमुख उद्दिष्टे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.