Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२६-२७ या रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खत अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 05:00 PM
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

Follow Us
Follow Us:
  • रब्बी हंगामासाठी ६२,३७० कोटींचे खत अनुदान मंजूर
  • मागील वर्षाच्या तुलनेत अनुदानात ६४ टक्क्यांनी वाढ
  • डीएपी आणि एनपीकेएस खतांचा अनुदानात समावेश
नवी दिल्ली : रब्बी हंगामातील पिकांसाठी खतांचा पुरवठा परवडणाऱ्या दरात व्हावा, यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२६-२७ या रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खत अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी तब्बल ६२ हजार ३७०.०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत यंदाच्या अनुदानात सुमारे ६४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी आणि एनपीकेएससह विविध खते अनुदानित दरात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

मागील वर्षापेक्षा २४ हजार कोटींची वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले हे अनुदान १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. मागील रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये खत अनुदानासाठी ३७ हजार ९५२.२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा त्यात २४ हजार ४१७.७३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या आणि कच्च्या मालाच्या किमतींमधील बदल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

डीएपी आणि एनपीकेएस खतांचा समावेश

या अनुदानात डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) तसेच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सल्फरयुक्त (NPKS) खतांच्या विविध ग्रेडचा समावेश आहे. युरिया, डीएपी, म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) आणि सल्फर यांच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा विचार करून अनुदानाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत खत उत्पादक आणि आयातदार कंपन्यांना मंजूर दरांनुसार अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा : पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती

मुद्रा योजनेसाठीही ५ हजार कोटींची तरतूद

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म उद्योगांसाठीच्या पत हमी निधीला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. यासाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ३१ मार्च २०३१ पर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत सुमारे १२.६ लाख कोटी रुपयांच्या मुद्रा कर्जांना पत हमी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. एकीकडे शेतकऱ्यांसाठी खत अनुदानात मोठी वाढ, तर दुसरीकडे लघुउद्योजकांसाठी कर्ज हमीची सुविधा, असे दोन महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रब्बी हंगाम २०२६-२७ साठी केंद्र सरकारने किती खत अनुदान मंजूर केले आहे?

    Ans: केंद्र सरकारने फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी ६२ हजार ३७०.०२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

  • Que: खत अनुदानाचा लाभ कोणत्या कालावधीसाठी मिळणार आहे?

    Ans: हे अनुदान १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.

  • Que: कोणत्या खतांचा या अनुदानात समावेश आहे?

    Ans: डीएपी (DAP), एनपीकेएस (NPKS) आणि विविध फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांच्या ग्रेडचा समावेश आहे.

Web Title: The modi government has approved a subsidy for the purchase of fertilizers for the rabi season nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…
1

पुणे महापालिकेच्या नऊ गावांच्या विकास आराखड्यात मोठे फेरबदल! रस्त्यांची रुंदी, संरेखन अन्…

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!
2

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी
3

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला
4

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.