Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neha Bora Detained Jantar Mantar: नेहा बोराला अटक, दिल्लीत पुन्हा इंटरनेट, मेट्रो स्टेशन बंद, देशात राजकारण तापणार

Jantar Mantar Protest 2.0; दिल्लीतील जंतर मंतर येथे पोलीस आणि निमलष्करी दलांनी सुरक्षा वाढवली आहे. अनेक राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2026 | 03:33 PM
Neha Bora AISA, Jantar Mantar Protest Delhi

Neha Bora AISA, Jantar Mantar Protest Delhi

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील जंतरमंतरवरूननेहा बोरा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना आक्रमक
  • “लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही”,  नेहा बोरांचा सरकारला इशारा
Neha Bora Detained Jantar Mantar:  दिल्लीतील जंतर मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात  आंदोलनाची हाक देणाऱ्या ऑल इंडिया स्टूडेंट्स एसोसिएशन च्या राष्ट्रीय अध्यक्षा  नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी मोहीम सुरू केली आहे. विरोधी पक्ष शुक्रवारी (२ ऑक्टोबर) दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे देशातील राजकारणा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- नेहा वोरा

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नेहा वोरा यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.  “तुम्ही देशासोबत जे केले आहे, त्यासाठी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आज तुम्ही आम्हाला बसेस मध्य भरत भरून लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पण पण एक दिवस तुम्हाला, दोनशे, दोन हजार, दोन लाख, २० लाख लोकांना  भरण्याची वेळ येईल, त्यानंतरही तुम्ही ज्ञानेश कुमार आणि इतर निवडणूक आयुक्ता यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण तुम्ही जी गद्दारी केली आहे. चोरी केली आहे, ज्ञानेश कुमार यांंनी देशाच्या जनतेसोबत जे केलं आहे त्याला माफी मिळणार नाही आणि ते विसरले जाणार नाही.” असा इशारा नेहा वोरा यांनी दिला आहे.

Abhijeet Dipke Viral Video: ‘चला, चहा घेऊ…’ म्हणत मुंबई पोलिस दिपकेंना घेऊन गेले; CJP आंदोलनापूर्वीचा मजेशीर VIDEO चर्चेत

𝗡𝗲𝗵𝗮 𝗯𝗼𝗿𝗮 detained at Jantar Mantar Salute from the heart to you Neha #DelhiProtest pic.twitter.com/LzeaTis5eg — Mahua Mitraa (@MahuaMoiitra) October 2, 2026

 

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) मुंबईत आंदोलन करण्याची तयारी करत आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, राजीनामा न दिल्यास आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय जनता पार्टीवर (भाजप) सातत्याने टीका करत आहेत.

जंतर मंतरच्या आत प्रवेश करण्यास सक्त मनाई

दुसरीकडे,  दिल्लीतील जंतर मंतर येथे पोलीस आणि निमलष्करी दलांनी सुरक्षा वाढवली आहे. अनेक राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे (CrPC) कलम १६३ लागू केले आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, संपूर्ण परिसरात कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांना परवानगी नाही. सध्या कोणालाही जंतर मंतरच्या आत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

सीजेपीने मुंबईत आंदोलनाची तयारी केली आहे. यावर अभिजीत दीपके म्हणाले होते, “कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन सुरू होत आहे. आम्ही देशभरात आंदोलन करणार आहोत. यानंतर आम्ही जंतर मंतरवर बसू आणि ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. ज्ञानेश कुमार हे देशद्रोही आहेत. २०२५ ची एसआयआर यादी तातडीने रद्द करावी. नियुक्त होणारा नवा कोणताही निवडणूक अधिकारी पारदर्शक असावा. नाहीतर ज्या १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, ते सर्व रस्त्यावर उतरतील.” असा इशाराही सीजेपीकडून देण्यात आला आहे.

सीजेपी नेते सौरव दास यांनीही तरुणांसह देशभरातील नागरिकांना शिवाजी पार्कवर येण्याचे आवाहन केलं आहे. , “आपल्यासोबत तरुण आहेत. सर्वांनी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कमध्ये यावे. आपण शांततापूर्ण आंदोलन करणार आहोत. देशभरात आंदोलने आधीच सुरू झाली आहेत.” असं सूचक विधानही सौरव दास यांनी केलं आहे.

 

Web Title: Nationalaisa president neha bora detained jantar mantar protest against gyanesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.