नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के (फोटो प्रातिनिधिक आहे)
नेपाळमध्ये शनिवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे 3.59 वाजता भूकंप झाला. भूकंपाची नोंद अक्षांश 29.17 एन आणि रेखांश 81.59 ई 10 किलोमीटर खोलीवर झाली असे सांगण्यात आले आहे. नेपाळमध्ये शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, नेपाळमध्ये शनिवारी पहाटे 03:59 वाजता भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी होती. मात्र, भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. 2023 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 70 लोकांचा मृत्यू झाला होता.
ANI ने केले ट्वीट
An earthquake with a magnitude of 4.8 on the Richter Scale hit Nepal at 03:59 AM today: National Center for Seismology pic.twitter.com/CMZQA2nepj
— ANI (@ANI) December 20, 2024
याआधी दोन वेळा भूकंप
यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये नेपाळमध्ये दोनदा भूकंप झाला होता. 1 एप्रिल 2023 रोजी डोखला जिल्ह्यातील सुरी येथे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. येथील नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, काठमांडूपासून 180 किमी पूर्वेला डोलाखा येथे सकाळी 11.27 वाजता (स्थानिक वेळेनुसार) 5.2 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. ओखलढुंगा, रामेछाप, सिंधुपाल चौक आणि नुवाकोट जिल्ह्यात तसेच काठमांडू खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर 28 एप्रिल 2023 रोजी रात्री भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू बाजुरा येथील डहाकोट येथे होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 आणि 5.9 इतकी होती.
विनाशकारी भूकंप
एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला. या कालावधीत, अंदाजे 9,000 लोक मारले गेले आणि अंदाजे 22,000 इतर जखमी झाले. यात 800,000 हून अधिक घरे आणि शाळा इमारतींचे नुकसान झाले.
Todays Gold Price: आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
नेपाळमध्येच सारखे भूकंप का?
आयआयटी कानपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि भूविज्ञान अभियांत्रिकीतील तज्ज्ञ प्रा. जावेद एन मलिक यांच्या मते, 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 ते 8.1 तीव्रतेचे भूकंपही झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळ होता. हिमालय पर्वतरांगातील अस्थिर टेक्टोनिक प्लेट्समुळे भूकंपाचे धक्के जाणवत राहतील.
भूकंप नक्की का येतो
पृथ्वीच्या आतील प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतात. भूगर्भशास्त्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपली पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्सची टक्कर झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या खाली असलेल्या या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत राहतात. दरवर्षी या प्लेट्स त्यांच्या जागेपासून 4-5 मिमी सरकतात. या कालावधीत, काही प्लेट्स इतरांपासून दूर जातात आणि काही इतरांच्या खाली सरकतात. या काळात प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो.
दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक, ४० गाड्या जळून खाक; अग्निताडवात ११ जणांचा होरपळून मृत्यू