दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक, ४० गाड्या जळून खाक; अग्निताडवात ११ जणांचा होरपळून मृत्यू
जयपूरमधून भयंकर दुर्घटना घडली आहे. अजमेरमध्ये शुक्रवारी पहाटे ६ वाजता दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक बसून मोठा स्फोट झाला. त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि ४० वाहने जळून खाक झाली.यात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे स्फोटानंतर परिसरात एकच पळापळ सुरू झाली होती.
दोन टँकरचा अपघात झाल्यानंतर जवळ असलेल्या कारखान्याला आग लागली. त्यानंतर कारखान्याला लागलेली आग वेगाने पसरत गेली. परिसरातील आग वेगाने पसरल्याने ३५ हून अधिक वाहनांनाही आग लागली. या भीषण आगीत वाहनांमध्ये बसलेले प्रवासी होरपळले. आग लागल्यानंतर काहींनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाने तातडीने रेस्कू ऑपरेशन सुरु केलं. या भीषण घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
जयपूर-अजमेर महामार्गावर दिल्ली पब्लिक स्कूलजवळ एलपीजी गॅसचा टँकर अजमेरहून जयपूरकडे निघाला होता. चालकाने अचानक टँकर वळवत होता. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी अचानक ब्रेक दाबले. याचवेळी दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक झाली. ही घटना इतकी भीषण होती की, या टँकरमधील गॅस परिसरात पसरला. त्यानंतर आग लागली. काही वेळात सर्वत्र आग पसरली. या आगीचा सर्वत्र भडका उडाला.
अपघातानंतर क्षणार्धात ४० वाहने जळून खाक झाली. ही आग थेट २०० मीटरपर्यंत पोहोचली. या आगीच्या घटनेनंतर लोक थेट १ किलोमीटर दूर पळाले. या आगीच्या घटनेत ३२ जण गंभीर जखमी झाले. त्यातील ५ जणांना डॉक्टरांनी आधीच मृत घोषित केले. तर ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका रुग्णाने जयपुरिया रुग्णालयात प्राण सोडला. अपघातादरम्यान, एका बसमध्ये ३४ जण होते. त्यातील २१ जणाची माहिती हाती आली आहे. तर अद्याप १३ जणांविषयी माहिती हाती आलेली नाही.
संभलमध्ये मुस्लिमबहुल भागात आढळून आलेले मंदिर प्रकरण सतत चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआयच्या टीमने कार्बन डेटिंग केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या टीमने गुप्तपणे कार्बन डेटिंग पूर्ण केली आहे. कार्बन डेटिंगसाठी चार सदस्यांची टीम तैनात करण्यात आली होती. एएसआयच्या पथकाने पाच तीर्थस्थळे आणि 19 प्राचीन कूपनलिका यांची गुप्तपणे तपासणी केली आहे.
ASI टीमने 19 प्राचीन नलिका विहिरींच्या स्थितीचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा बारकाईने अभ्यास केला आहे. पण एएसआय टीमने प्रशासनाला सर्वेक्षण मीडिया कव्हरेजपासून दूर ठेवण्यास सांगितले होते. जेणेकरून कोणत्याही प्रकारची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही. एएसआयच्या पथकाने केलेल्या तपासामुळे इतिहासाच्या नव्या पैलूंवर प्रकाश पडेल, असे मानले जात आहे.
एएसआय सर्वेक्षणाची माहिती देताना संभलचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, मंदिराचे सर्वेक्षण सुरक्षित आणि शांततेत पूर्ण झाले आहे. एएसआय टीमने प्राचीन कार्तिकेय मंदिराच्या कार्बन डेटिंगचे काम गुप्तपणे पूर्ण केले आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि तणाव टाळण्यासाठी ही प्रक्रिया मीडिया कव्हरेजपासून दूर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एएसआयच्या चार सदस्यीय टीमने कार्बन डेटिंगची प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची विनंती केली होती, असेही ते म्हणाले. भद्रकाश्रम, स्वर्गदीप, चक्रपाणी, प्राचीन तीर्थक्षेत्र स्मशान मंदिरासह १९ विहिरींची पाहणी करण्यात आली. वास्तविक, ASI ने प्रशासनाला ASI तपासणीला मीडिया कव्हरेजपासून दूर ठेवण्याची विनंती केली होती.