Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lockdown India: देशात पुन्हा लॉकडाऊन? सोशल मीडियावरील अफवांवर केंद्र सरकारचा मोठा खुलासा

आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याचा मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर, हरदीप सिंग पुरी यांनी लॉकडाऊनबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 27, 2026 | 01:18 PM
Lockdown Rumors India 2026, Hardeep Singh Puri Tweet,

Lockdown Rumors India 2026, Hardeep Singh Puri Tweet,

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात पुन्हा कोविड १९ सारखे ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या चर्चा
  • पंतप्रधान मोदींच्या विधानाचा विपर्यास
  • पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पूरी यांचे सूचक विधान
Hardeep Singh Puri  Tweet on Lockdown India: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा कोविड १९ सारखे ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या या वावड्यांवर केंद्र सरकारने आता अधिकृतपणे पडदा टाकला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारची भूमिका स्पष्ट केले आहे. ‘देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.”असं पूरी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच संसदेत कोविड-१९ च्या परिस्थितीवर भाष्य करताना देशाला ‘तयार राहा’ असे आवाहन केले होते. मात्र, या विधानाचा विपर्यास करून काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली. गेल्या २४ ते ४८ तासांपासून काही जुने व्हिडिओ आणि खोट्या पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होत्या, ज्यावर सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे.

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

 

आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याचा मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर, हरदीप सिंग पुरी यांनी लॉकडाऊनबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत म्हटले की: “भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, शासकीय स्तरावर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. नागरिकांनी अशा बेजबाबदार अफवांना बळी पडू नये.”

तसेच, जरी जागतिक परिस्थिती अनिश्चित असली, तरी भारत सरकार ऊर्जा, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशाला इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहील, याची खात्री पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली घेतली जात आहे. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे तयार आहेत. अशा काळात अफवा पसरवणे हे हानिकारक असून नागरिकांनी शांत, जबाबदार आणि एकजूट राहणे आवश्यक आहे.” असं पूरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुन्हा मास्क अन् बूस्टर डोस…! ‘या’ देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, भारताची काय परिस्थिती?

अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आधीच इशारा दिला होता की, काही लोक अनिश्चिततेच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन समाजात घबराट पसरवण्याचा प्रयत्न करतील. अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

 

Web Title: No lockdown in india union minister hardeep singh puri debunks social media rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.