Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi High Court: अरेरे… दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अचानक सुरु झाला अश्लील व्हिडिओ; न्यायाधीशांसह वकीलही अवाक

दिल्ली उच्च न्यायालयाची व्हर्च्युअल सुनावणी सुरू असताना अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. हा सायबर हल्ला असून दिल्ली पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 29, 2026 | 05:19 PM
दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अचानक सुरु झाला अश्लील व्हिडिओ (Photo Credit- X)

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अचानक सुरु झाला अश्लील व्हिडिओ (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • अरेरे…
  • दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अचानक सुरु झाला पाॅर्न व्हिडिओ
  • न्यायाधीशांसह वकीलही अवाक
Delhi High Court Pornographic Content: दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या न्यायालयात मंगळवारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाच्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंग (VC) सिस्टीममध्ये अचानक अश्लील व्हिडिओ प्रसारित होऊ लागले. या गंभीर प्रकारामुळे न्यायालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्राथमिक तपासात हा ‘सायबर हल्ला’ असल्याचे बोलले जात आहे.

सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे व्हर्च्युअल माध्यमातून सुरू होते. अचानक श्रीधर सरनोबत आणि शीतजीत सिंह नावाच्या युजर्सच्या अकाउंटवरून आक्षेपार्ह मजकूर आणि अश्लील व्हिडिओ प्ले होऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच तांत्रिक बिघाड किंवा दुरुपयोग रोखण्यासाठी न्यायालयाची व्हर्च्युअल यंत्रणा तात्काळ बंद करण्यात आली.

“यु आर हॅक्ड!”; हॅकर्सचा ऑडिओ मेसेज

काही मिनिटांनंतर जेव्हा तांत्रिक टीमने पुन्हा एकदा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा तेच व्हिडिओ दिसू लागले. इतकेच नाही तर बॅकग्राउंडमध्ये एक स्वयंचलित (Automated) व्हॉईस मेसेज ऐकू आला. त्यामध्ये असे म्हटले होते की, “हा अमेरिकेतून केलेला हॅक आहे. मीटिंग आताच बंद करा, पुन्हा कधीही सुरू करू नका. तुम्ही हॅक झाला आहात.” या धमकीवजा संदेशानंतर न्यायालयाची व्हर्च्युअल लिंक तातडीने कायमची बंद करण्यात आली.

“मी आरोपी म्हणून नाही, तर…”, उच्च न्यायालयात Arvind Kejriwal यांचा जोरदार युक्तिवाद; ‘या’ मुद्द्यावर लक्ष केलं केंद्रित

दिल्ली पोलिसांच्या ‘IFSO’ युनिटकडे तपास

या घटनेची गांभीर्याने दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या ‘इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स’ (IFSO) या विशेष सायबर युनिटकडे सोपवला आहे. हे प्रकरण केवळ तांत्रिक बिघाड नसून सुनियोजित सायबर हल्ला असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता ज्या आयपी एड्रेसवरून (IP Address) हा व्हिडिओ प्रसारित झाला, त्याचा शोध घेत आहेत.

न्यायपालिका आणि सायबर सुरक्षेचा प्रश्न

भर न्यायालयात घडलेल्या या प्रकारामुळे न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेला आणि डिजिटल सुरक्षा व्यवस्थेला मोठे आव्हान मिळाले आहे. रजिस्ट्रार जनरल यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. हायब्रीड आणि ऑनलाइन कोर्टाच्या कामकाजासाठी वापरले जाणारे प्लॅटफॉर्म किती सुरक्षित आहेत, यावर आता तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Gautam Gambhir आक्रमक! AI डीपफेक आणि बनावट व्हिडिओंविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव; अडीच कोटींच्या मानहानीचा दावा

Web Title: Obscene video suddenly starts during virtual hearing in delhi high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • delhi high court
  • porn movies

संबंधित बातम्या

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
1

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.