loc (फोटो सौजन्य : social media )
मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सैनिक पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केली. या एअर स्ट्राइकच नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलातील पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले दहशतवादी नऊ तळांवर हवाई हल्ले केले. ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तानी सैन्य पार हडबडून गेल्याच स्पष्ट दिसतय. LOC ला लागून असलेल्या गावांमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार, तोफगोळ्यांचा मारा सुरु आहे. भरती सैन्य पाकिस्तानच्या या नापाक कृतीला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही हल्ले सुरुच; पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद
भारतीय सैनेने दिलेल्या प्रत्युत्तरनंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. सियालकोटच्या बाजवत सेक्टरमध्ये सीमेला लागून असलेल्या गावांमधून लोकांना बाहेर काढण्याच काम पाकिस्तानी सैन्याने सुरु केलं आहे. सियालकोटमध्ये नुसती पळापळ सुरु आहे. तिथे गोंधळाची स्थिती आहे. संपूर्ण शहरात इमर्जन्सीचे सायरन वाजवले आहेत. माईकवरुन सतत घोषणा केल्या जात आहेत. पाकिस्तानी सैन्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं अपील केलं आहे.
पाकिस्तानी LOC वर भारताच्या सामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. LOC ला लागून असलेल्या गावांवर पाकिस्तानने तोपगोळे आणि मोर्टारचा मारा केला. यात कुपवाडाच्या करनाह आणि पुंछमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. यात लहान मुलं सुद्धा आहेत. अधिकाऱ्यांनुसार, 13 जणांना मृत्यू झाला. 57 जखमी झालेत. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून 7 आणि 8 मे च्या रात्री अंदाधुंद गोळीबार सुरु होता. भारतीय लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे
LOC वर भारत पूर्णपणे सज्ज – एलजी मनोज सिन्हा
पाकिस्तानने भारताविरोधात मोठ्या प्रमाणात मनमानी आणि अंदाधुंद गोळीबार केला असं जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले. भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राइक करताना निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं नाही. LOC वर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असं एलजी मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.
operation sindoor: “भारताला मोठी किंमत मोजावी लागेल”, पाकिस्तानी पंतप्रधानांची धमकी