
Opposition to march to Election Commission over SIR process displeasure over Bihar election 2025
Bihar Elections 2025 : पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी जोरदार राजकारण तापले आहे. बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वरून वातावरण तापले आहे. याचा परिणाम दिल्लीपर्यंत पोहचला असून पावसाळी अधिवेशनामध्ये देखील SIR चे परिणाम दिसून आले आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या सुधारणांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सरकारवर संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनी या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की सरकार SIR बद्दल बोलू इच्छित नाही कारण ते काहीतरी लपवू इच्छित आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली आहे आणि ११ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे विरोधकांनी ठरवले आहे. दुसरीकडे, केंद्र सरकार म्हणते की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे संसदेत त्यावर चर्चा करता येणार नाही. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे, परंतु चर्चा नियमांनुसारच झाली पाहिजे, असे मत सरकारकडून मांडण्यात येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकार SIR वर चर्चा का करू इच्छित नाही?
कॉंग्रेस नेते वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “सरकार आम्हाला SIR या शब्दाबद्दल बोलूही देत नाहीत, असे का? निवडणूक आयोगाने ही व्यवस्था सुरू केली, पण ते SIR वर चर्चा करण्यापासून पळून जात आहेत. त्यांना काय लपवायचे आहे? भारतातील लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की SIR का होत आहे, त्याची गरज काय आहे? आमचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आधार आणि निवडणूक ओळखपत्रे समाविष्ट करण्यास सांगितले आहे, परंतु ते सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकत नाहीत. मतांचे विभाजन करण्याचा हा स्पष्टपणे एक छुपा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधी पक्षांची आघाडी असलेली इंडिया अलायन्स म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्सचे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुऱ अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होणार आहेत. हा मोर्चा ११ ऑगस्ट रोजी दिल्लीतील अशोका रोडवरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात होईल. यामुळे बिहारच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीचे वातावरण तापले आहे.