Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात कोणाचे होणार सरकार? इम्रान खान आणि ISI चा मोठा डाव; नवाझ शरीफ बसणार विरोधी बाकावर; ‘हे’ नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

Pakistan : पाकिस्तानमध्ये निवडणुकांचे निकाल लागून अनेक दिवस झाले आहेत. असे असताना नवाझ शरीफ हे पाकिस्तानात सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसत आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 17, 2024 | 06:48 PM
पाकिस्तानात कोणाचे होणार सरकार? इम्रान खान आणि ISI चा मोठा डाव; नवाझ शरीफ बसणार विरोधी बाकावर; ‘हे’ नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत
Follow Us
Follow Us:

Pakistan Gov : पाकिस्तानच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतरही ( Pakistan General Elections) पंतप्रधान कोण होणार? हे निश्चित झालेलं नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे प्रमुख नवाझ शरीफ केंद्रात सरकार स्थापन करणार नसल्याची चर्चा आहे. नवाज आणि शाहबाज शरीफ यांच्यात आघाडी सरकारबाबत चर्चा झाली आहे. आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सरकार बनवण्यात आणि पाडण्यात पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था ISI यांची मोठी भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे.

निवडणुकीनंतर नवाझ शरीफ यांनी जबाबदारी
8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी, नवाझ शरीफ यांनी त्यांचे धाकटे बंधू आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे सरकार स्थापनेचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी शेहबाज शरीफ यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान आणि जमात-उल-इस्लामी (फझल) यांच्यासोबत आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी बैठका घेऊन सरकार स्थापनेची योजना आखण्याची सूचना केली होती.

‘पाकिस्तानी लष्करामुळे पराभवाला सामोरे जावे लागले’
अलीकडेच जमात-उल-इस्लामीच्या (फजल) अमीर फजल-उर-रहमान यांनी पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, पाकिस्तानी लष्करामुळे पीटीआयला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी लष्करानेच मला आणि नवाझ शरीफ यांना नॅशनल असेंब्लीत विरोधी पक्षात बसण्यास सांगितले आहे, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

अमीर फजल-उर-रहमान यांच्या या मुलाखतीनंतर नवाज यांना वाटते की, सर्वाधिक जागा जिंकूनही केंद्रात आघाडीचे सरकार बनवणे योग्य नाही. पाकिस्तानात लष्कराच्या विरोधात जाणे शक्य नाही. CNN-News18 च्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला शहबाज यांना पंतप्रधानपदासाठी नामांकन देऊनही, नवाज यांना आता वाटते की नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षात बसणे चांगले आहे.

आयएसआयने इम्रानविरोधात रचला कट
पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस म्हणजेच आयएसआयच्या प्रतिनिधींनी अदियाला तुरुंगात इम्रान खान यांची भेट घेतल्याचेही अहवालात म्हटले आहे. या बैठकीनंतर एक करार झाला, त्यानंतर इम्रानने उमर अयुब खान यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नियुक्त केले. उमर अयुब हे पीटीआयचे सरचिटणीसही आहेत.

पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या JUI-F प्रमुखच्या मुलाखतीनंतर पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) आघाडीमध्ये तेढ निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट अलायन्सने अविश्वास ठरावाच्या मतदानात इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर सरकारची सूत्रे हाती घेतली.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही विशेष सूचना दिल्या
पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत JUI-F नुसार, माजी ISI प्रमुख फैज हमीद यांनी त्यांना इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यास सांगितले होते.

पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी फैज हमीद यांच्यासह पाकिस्तानच्या राजकीय पक्षांना इम्रान खान यांना सत्तेवरून हटवण्याचे निर्देश दिल्याचा दावाही त्यांनी या मुलाखतीत केला होता. मी बाजूने नव्हतो, पण मी त्याला पाठिंबा दिला होता, कारण मी सूचनांच्या विरोधात गेलो असतो, तर मी इम्रान खानला वाचवले, असे पाकिस्तानी डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने म्हटले असते, असे फजल म्हणाले.

Web Title: Pakistan giverement imran khan and isi big plot nawaz sharifs party will be main opposition this name in race for post of pm post nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2024 | 06:28 PM

Topics:  

  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan Defense: मित्रच बनला काळ! सौदी अरेबियाने पाकिस्तानचे ‘आफ्रिकन स्वप्न’ चिरडले; हा’ करार रद्द केल्याने असीम मुनीर अडचणीत
1

Pakistan Defense: मित्रच बनला काळ! सौदी अरेबियाने पाकिस्तानचे ‘आफ्रिकन स्वप्न’ चिरडले; हा’ करार रद्द केल्याने असीम मुनीर अडचणीत

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द
2

Pakistan Period Tax: पाकिस्तान सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय! सॅनिटरी पॅड्स आणि गर्भनिरोधकांवरील 18% टॅक्स केला पूर्णपणे रद्द

PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये 70 हजार आंदोलक रस्त्यावर; 20 हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद
3

PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये 70 हजार आंदोलक रस्त्यावर; 20 हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद

Bannu Blast : पाकिस्तानात एकापाठोपाठ एक भीषण बॉम्बस्फोट; बन्नूमध्ये दहशतवाद्यांनी वाहनांना बनवले लक्ष्य, 7 जणांचा मृत्यू
4

Bannu Blast : पाकिस्तानात एकापाठोपाठ एक भीषण बॉम्बस्फोट; बन्नूमध्ये दहशतवाद्यांनी वाहनांना बनवले लक्ष्य, 7 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.