नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला करत 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब ठार झाले आहे. पहालगाममध्ये 26 पर्यटकांना थाट मारणाऱ्या पाकिस्तानचा बदला भारताने घेतला. पाकिस्तानला अनेक निर्णय घेऊन, हल्ला करून धडा शिकवलं. मात्र पाकिस्तान सुधरण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. जैशचे मुख्यालय पुन्हा एकदा उभे राहणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले आहे. कुटुंबाला पाकिस्तानने एक-एक कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसुद अजहरचे 14 नातेवाईक ठार झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान कदाचित मसूद अजहरच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये देण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने अजहरला 14 कोटी रुपये दिल्यास तो पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचा किल्ला उभा करण्याची शक्यता आहे. मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने जैश ए मोहम्मदचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात अजहरचे 14 नातेवाईक देखील ठार झाले.
पाकिस्तानी सरकार अजहरला 14 कोटी देणार?
पाकिस्तान सरकार मसूद अजहरला 14 कोटी देणार आहे. मसूद अजहर पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी कारवाया राबवत असे. संयुक्त राष्ट्र संघाने मसूद अजहरला दहशतवादी घोषित केले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मसूद अजहरचे सर्वदडे उद्ध्वस्त केले.
BSF जवान भारतात परतताच पत्नीने मानले पंतप्रधानांचे आभार
पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान या तणावाच्या काळात भारताचा एक जवान पाकिस्तानमध्ये चुकून पोहोचले होते. मात्र आज सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. 14 मे ला सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पाकिस्तानने त्यांना सुरक्षितपणे भारताच्या स्वाधीन केले. यावर आता बीएसएफ जवानाच्या पत्नीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
गेल्या 22 दिवसांपासून बीएसएफ जवान पी. के. साहू भारतात परतले आहेत. दरम्यान त्यांच्या कुटुंबाने सरकारचे आभार मानले आहेत. पी. के. साहू यांच्या पत्नी यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. बीएसएफ जवान भारतात परततल्यावर सैन्य अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.
BSF जवान भारतात परतताच पत्नीने मानले पंतप्रधानांचे आभार; म्हणाली, “मोदीजी ने मेरा…”
आमच्यासाठी गेले 22 दिवस अत्यंत कठीण होते. यांच्या कठीण स्थितीमध्ये सरकार, सैन्यातील अधिकारी, देशवासीय आमच्या पाठीशी होते. त्या सर्वांचे मी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया, असे म्हणत बीएसएफ जवानाच्या पत्नीने केंद्र सरकार , पंतप्रधान मोदी आणि सैन्याचे आभार मानले.