बीएसएफ जवानाच्या पत्नीने मानले मोदींचे आभार (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान या तणावाच्या काळात भारताचा एक जवान पाकिस्तानमध्ये चुकून पोहोचले होते. मात्र आज सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. 14 मे ला सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पाकिस्तानने त्यांना सुरक्षितपणे भारताच्या स्वाधीन केले. यावर आता बीएसएफ जवानाच्या पत्नीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
गेल्या 22 दिवसांपासून बीएसएफ जवान पी. के. साहू भारतात परतले आहेत. दरम्यान त्यांच्या कुटुंबाने सरकारचे आभार मानले आहेत. पी. के. साहू यांच्या पत्नी यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. बीएसएफ जवान भारतात परततल्यावर सैन्य अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.
आमच्यासाठी गेले 22 दिवस अत्यंत कठीण होते. यांच्या कठीण स्थितीमध्ये सरकार, सैन्यातील अधिकारी, देशवासीय आमच्या पाठीशी होते. त्या सर्वांचे मी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया, असे म्हणत बीएसएफ जवानाच्या पत्नीने केंद्र सरकार , पंतप्रधान मोदी आणि सैन्याचे आभार मानले.
Operation Sindoor: पाकिस्तान की चीन भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिले. पहलगाम हल्ल्यात ज्या महिलांचे कुंकू पुसले गेले त्याचा आपण बदला घेतला. आता मला माझे कुंकू परत मिळवून दिले. मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे, अशा शब्दात पाकिस्तानमधून भारतात परत आलेल्या बीएसएफ जवानाच्या पत्नीने भावुक होत प्रतिक्रिया दिली आहे.
सीमा सुरक्षा दल पंजाब फ्रंटियरने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना आज सकाळी १०:३० वाजता अटारी-वाघा संयुक्त चेकपोस्टवरून पाकिस्तान रेंजर्सनी भारताच्या स्वाधीन केले. हे हस्तांतरण शांततेत आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार पार पडले.” यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात असलेले पूर्णम कुमार शॉ यांनी २३ एप्रिल रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि नंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
यापूर्वी ५ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी येथील बीएसएफ कॉन्स्टेबलबद्दल चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहेत.
BSF jawan Purnam Shaw: पाकिस्ताने BSF जवान पी. के. शॉ यांना भारताकडे सोपवले, 20 दिवसांनी पाकने सोडलं
पंजाबमधील फिरोजपूरजवळील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडल्यानंतर बीएसएफ जवानाला २३ एप्रिल रोजी पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. सुरुवातीच्या अहवालांनुसार, सैनिक चुकून पाकिस्तानी हद्दीत घुसला होता. बीएसएफने आपल्या जवानांना सीमेवर गस्त घालताना सतर्क आणि सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले होते.