नवी दिल्ली : धर्मांतरच्या मुद्यावर आधारित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोक हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना कसे टार्गेट करतात आणि नंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांना सीरियात पाठवतात, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासारखीच ‘बरेली फाईल्स’ची (Bareilly Files) चर्चा सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक घटना समोर आली आहे. बरेलीमध्ये मुस्लिम मुलींना हिंदू बनवले जाते आणि नंतर त्यांचे लग्न त्यांच्या हिंदू प्रेमीसोबत लावले जाते. पंडित शंखधार यांनी आत्तापर्यंत 78 मुस्लिम मुलींचे हिंदू धर्मात धर्मांतर केले. धर्मांतर आणि विवाहाचे हे कार्य मदिनाथच्या अगस्त्य मुनी आश्रमाचे आचार्य पंडित के. के. शंखधर यांनी केले. गेल्या 10 वर्षात 78 मुलींचे धर्मांतर करून त्यांची लग्न लावली आहेत.
हिंदू धोका देत असल्याचे मेसेज
पंडित के. के. शंखधर हे मूळचे रामपूरच्या परमकुप गावचे आहेत. 40 वर्षांपूर्वी बरेलीला गेले आणि अगस्त्य मुनी आश्रमात पुजारी झाले. पूजेचे काम वडील आणि आजोबाही करायचे. ते स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवतात आणि हिंदू संघटनांशी संबंधित आहे. पंडित के. के. शंखधर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. 2013 मध्ये त्याने फेसबुकवरील मेसेजवरून मुस्लिम मुलींचे हिंदू मुलांशी लग्न लावण्याचे काम सुरू केले.
8 वर्षात 35 तर गेल्या एका वर्षात 40 लग्न
शंखधर यांनी सांगितले की, ‘2013 नंतर, दरवर्षी कधीतरी हिंदू मुले तर कधी मुस्लिम मुली लग्नाबाबत बोलायचे. आम्ही त्यांच्या वयाशी संबंधित कागदपत्रे तपासली आणि त्यांचे लग्न लावून दिले. 2022 पर्यंत हा आकडा 35 च्या आसपास पोहोचला होता, पण त्यानंतर त्यात वाढ झाली. गेल्या वर्षभरात सुमारे 40 मुलींची लग्ने लावल्याचे म्हटले.