Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा पहिला वादळी दिवस; SIR वरून विरोधकांचा राडा, लोकसभेचे कामकाज ठप्प

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार एसआयआर आणि निवडणूक सुधारणांवरील चर्चेला विरोध करत नाही, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी अधिक वेळ हवा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 02, 2025 | 01:08 PM
Parliament Winter Session:

Parliament Winter Session:

Follow Us
Close
Follow Us:
  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरुवात
  • पहिल्याच दिवशी मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR)वरून विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक
  • विरोधी पक्षांच्या गदारोळादरम्यान, लोकसभेने मणिपूर जीएसटी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५ ला मंजुरी
 

Parliament Session News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरुवात झाली. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसारच हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वरून विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज विस्कळीत झाले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सभात्याग केला. एसआयआर वरून चर्चेला विरोध नाही. पण त्यासाठी निश्चित कालावधी निश्चित करता येणार नाही, असे सरकारने सांगितले.

आज ( २ डिसेंबर) लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक सुधारणांवर चर्चेसाठी निषेध करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनाच्या मकर गेटजवळ जमून हा निषेध करतील. पण जर सरकार SIRवर चर्चा करू इच्छित नसेल, तर निवडणूक सुधारणांसारख्या व्यापक मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते आणि विरोधी पक्ष या मागणीचा पाठपुरावा करू शकतात. असेही सांगितले जात आहे.

मणिपूर जीएसटी विधेयक लोकसभेत मंजूर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, विरोधी पक्षांच्या गदारोळादरम्यान, लोकसभेने मणिपूर जीएसटी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५ ला मंजुरी दिली. विरोधी पक्षांच्या घोषणाबाजी दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, २०२५ आणि आरोग्य आणि सुरक्षा उपकर (राष्ट्रीय सुरक्षा उपकर) विधेयक, २०२५ देखील सादर केले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज विस्कळीत झाले आणि दोन वेळा तहकूब झाल्यानंतर, सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (Parliament Winter Session News)

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार एसआयआर आणि निवडणूक सुधारणांवरील चर्चेला विरोध करत नाही, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष एसआयआरवर त्वरित चर्चा करण्याची मागणी करत असताना रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. दरम्यान, काँग्रेस खासदार रेणुका चौधरी त्यांच्या गाडीत एक भटका कुत्रा घेऊन संसदेत आल्याने वाद निर्माण झाला, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्यावर नाटक केल्याचा आरोप केला. वादाच्या दरम्यान “आत बसलेले लोक चावतात, कुत्रे चावत नाहीत.” असा टोला रेणुका चौधरी यांनी लगावला.

एसआयआरवरील चर्चेवरून सभागृहात गोंधळ

लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांचे सदस्यांनी उभे राहत एसआयआरसह काही निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. नंतर, काही सदस्य सभापतींच्या व्यासपीठाजवळ आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना रचनात्मक भूमिका बजावण्याचे आणि सभागृहाचे कामकाज पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. पण त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने त्यांनी सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. तहकूब झाल्यानंतरही, दुपारी १२ वाजता सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर, विरोधी सदस्यांचा गोंधळ सुरूच राहिला, ज्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास विस्कळीत झाला.

Web Title: Parliament winter session stormy start to winter session opposition disrupts lok sabha proceedings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:08 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत
1

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
2

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.