अशा परिस्थितीत, जर तुम्ही आतापासूनच तयारी केली तर तुमचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तुमचे नाव मतदार यादीत कायम स्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहे.
बिहारप्रमाणे देशातील १२ राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.
आगामी काळात ज्याठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांचा समावेश या पहिल्या टप्प्यात होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे.
बिहारच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५.५ टक्के हिंदू उच्च जाती — ब्राह्मण, राजपूत, भूमिहार आणि कायस्थ — आहेत. हा वर्ग परंपरेने राजकीयदृष्ट्या प्रभावी राहिला आहे.
ज्ञानेश कुमार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. आयोगाने ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी बिहारला भेट दिली. या काळात, मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्ष, अधिकारी आणि पोलिस विभागाशी संपर्क साधला.
सप्टेंबरमध्ये राहुल गांधींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांनी यापूर्वी मलेशियाला भेट दिली होती. पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नव्हते.
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणस मेलेली दाखवतात, हे सुप्रीम कोर्टासमोर आले आहे. हा तर मोदींचा फंडा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
बिहारमधील व्होटर लिस्टच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला ‘...अन्यथा आम्ही ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करू’ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
निवडणूक आयोगाने देशभरात एकाच वेळी SIR लागू करण्याचे संकेत दिले आहेत, बिहारमध्ये ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील, १० सप्टेंबर रोजी दिल्लीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.