Ahmedabad Plane Crash: बंगलोर ते अहमदाबाद...! 'हे' आहेत भारतातील भयानक विमान अपघात; यादी एकदा वाचाच...
सगळ्यात कमी वेळेत सुखकर होणारा तो म्हणजे विमान प्रवास. एकदा तरी विमानाने प्रवास करावा असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं.विमान प्रवास श्रीमंत माणसांसाठी म्हणून पाहिला जातो मात्र आता हाच विमान प्रवास मृत्यूचा सापळा होताना दिसत आहे. आज झालेल्या अहमदाबाद ते लंडन या विमान अपघाताने अनेकांना सुन्न केलं आहे. सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण विमान प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र झालेल्या या विमान अपघाताने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. याआधी देखील असे काही विमान भयंकर विमान अपघात झालेले आहेत याबाबत जाणून घेऊयात.
हवामानातील अचानक होणारे बदल तसंच विमानातील तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकांच्या चुकांपासून ते गंभीर हवामान परिस्थिती आणि धावपट्टी ओलांडणे. अशी काहीशी मुख्य कारणं ही विमान अपाघातास कारणीभूत ठरतात.
एका न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार 1978 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या विमान अपघाताची दुर्घटना घडली होती.
एअर इंडिया फ्लाइट 855 (1978 ) – अरबी समुद्रातील दुर्घटना
1 जानेवारी 1978 रोजी मुंबईमध्ये सर्वात मोठ्या विमान अपघाताची दुर्घटना घडली होती. एअर इंडिया फ्लाईट 855 हे विमान मुंबई विमानतळावरुन दुबईला जाण्यास निघाले होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि काही वेळातच विमान उड्डाण घेतल्यानंतर अरबी समुद्रात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील 213 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात instrument redundancy checks यातील तांत्रिक बिघाडामुळे झाला. या अपघातामुळे देशपातळीवर मोठा धक्का बसला होता. याचकारणामुळे instrument redundancy checks अतिरिक्त तपासणी आणि पायलट प्रशिक्षण प्रक्रियेत बदल करण्यात आले.
इंडियन एअरलाइन्स फ्लाइट605 (1990) बंगळुरू क्रॅश
14 फेब्रुवारी 1990 रोजी , इंडियन एअरलाइन्सचे फ्लाईट 605 बंगळुरू विमानतळावर येताना कोसळले . विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे एअरबस ए 320 धावपट्टी ओलांडून खाली उतरले. या अशा लॅन्डींगमुळे विमानाचे तुकडे झाले. या अपघातात 146 प्रवाशांपैकी 92 प्रवाशांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे ए 320 कॉकपिट एर्गोनॉमिक्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
चरखी दादरी विमानातील मध्य-हवाई टक्कर (1996) – भारतीय हवाई क्षेत्रातील सर्वात घातक घटना
12 नोव्हेंबर 1996 रोजी हरियाणा येथे दोन विमानांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता. सौदी अरेबियन एअरलाइन्सचे बोईंग 747 विमान हरियाणातील चरखी दादरीजवळ कझाकस्तान एअरलाइन्सच्या इल्युशिन इल-76विमानाशी टक्कर झाली. हा विमान अपघात जगातील सर्वात गंभीर अपघात झाल्याचं म्हटलं जातं. या अपघातात एकूण 349लोक मृत्युमुखी पडले. विमनातील तांत्रिक बिघाड आणि हवाई वाहतूक सूचनांचे पालन न करणे हे या अपघाताचे मुख्य कारण असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर, भारताने सर्व विमानांमध्ये ट्रॅफिक कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम (TCAS) चा वापर अनिवार्य केला आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812(2010) – मँगलोर रनवे अपघात
22मे 2010 रोजी , दुबईहून मँगलोर जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 812 धावपट्टीवरून घसरून थेट दरीत कोसळले. त्यावेळी या विमानात 166 प्रवासी प्रवास करत होते. यातील 158 जणांचा या अपघातात मृत्यू झाला . विमानतळाच्या टेबलटॉप रनवे , पायलटचा थकवा आणि चुकीचा लँडिंग , हे प्रमुख कारण होते. या अपघातामुळे कडक भूप्रदेश-आधारित लँडिंग प्रोटोकॉलची आवश्यकता अधोरेखित झाली आणि उच्च-जोखीम असलेल्या ठिकाणी विमानतळ सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आहेत .
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 (2020)- कोझिकोड अपघात
7ऑगस्ट 2020 रोजी दुबईहून येणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1344 हे पावसामुळे कोझिकोड विमानतळावर धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावासाने पायलटचे नियंत्रण सुटले आणि अपघातात विमानाचे तुकडे झाले.
या अपाघात दोन पायलटसह 21जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे़हवामानावर आधारित लँडिंग प्रोटोकॉल , धावपट्टीचा विस्तार आणि संवेदनशील विमानतळांवर आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.