फोटो सौजन्य: iStock
Ahmedabad Plane Crash News: हल्ली विमान कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतेच गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक प्रवासी विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. हे विमान एअर इंडियाचे असल्याचे बोलले जात आहे. या विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. एका रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले आहे. या विमान अपघातात जीवितहानी देखील झाल्याची शक्यता आहे. या घटनेननंतर आता विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. हीच बाब लक्षात घेत आज आपण सर्वच एअरलाईन्सने प्रवाशांच्या सेफ्टीबाबत कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
विमानाची स्थिती: प्रत्येक उड्डाणापूर्वी विमानामधील यंत्रणेची, ज्यामध्ये इंजिन, हायड्रॉलिक्स आणि एव्हियोनिक्स यांचा समावेश आहे. याची सखोल तपासणी केली गेली पाहिजे.
प्रवाशांची सुरक्षा : केबिन क्रू आपत्कालीन एक्झिट मार्ग स्पष्ट असावेत. तसेच विमानात लाईफ जॅकेट उपलब्ध असावेत. यासोबतच प्रवाशांना आपत्कालीन प्रक्रिया समजल्या आहेत का याची पडताळणी करावी.
फ्लाइट क्रू: पायलट आणि फ्लाइट क्रू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत का याची खात्री केली पाहिजे.
सतत प्रशिक्षण: वैमानिक व केबिन क्रू यांना त्यांच्या भूमिकांमध्ये कुशलता यावी म्हणून विमान कंपन्यांनी नियमित व सखोल प्रशिक्षण द्यावेत.
इमर्जन्सी सिच्युएशन मॅनेजमेंट: आग, टर्ब्युलन्स किंवा मेडिकल इमर्जन्सी सारख्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी क्रूला विशेष प्रशिक्षण दिले जावे.
महत्वाची नियमावली (SOP): उड्डाणाशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेसाठी ठराविक नियमावली असते, ज्याचे पालन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे.
नियोजित देखभाल: विमानांची नियमित तपासणी केली जाते जेणेकरून ती सतत कार्यक्षम आणि सुरक्षित राहतील.
खराबी दिसल्यास दुरुस्ती व्हावी : देखभालीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची नोंद केली जावी. तसेच त्वरित दुरुस्ती केली जावी.
स्पष्ट संवाद: हवाई वाहतूक नियंत्रक (ATC) उड्डाणाच्या प्रत्येक टप्प्यावर वैमानिकांशी सतत संवाद साधून उड्डाण सुरळीत ठेवावे.
आपत्कालीन परिस्थिती हाताळणे: विमानातील कोणत्याही तांत्रिक किंवा वैद्यकीय अडचणींच्या वेळी Air Traffic Control प्रभावी मार्गदर्शन करते.
अतिरिक्त सुरक्षा उपाय : विमानाचे इंजिन, स्पीड, उंची आणि इतर कार्यक्षमतेचे निरीक्षण आधुनिक यंत्रणेद्वारे केले जावे. जेणेकरून विमान अपघातांना आळा घालता येईल.