PM Kisan Yojana:
PM Kisan Yojana 20th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या लोकप्रिय पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज (शनिवार) २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत १९ हप्ते लाभार्थ्यांना मिळाले असून, आजपासून पुढचा ₹२००० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना खात्यात जमा केला जाणार आहे. या टप्प्यात देशभरातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ₹२००० रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत एकूण ₹२०,५०० कोटी रुपयांचा निधी या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला आहे.
या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण ₹६,००० आर्थिक मदत दिली जाते. हा निधी थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. अनेक लाभार्थ्यांना उत्सुकता आहे की त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही. हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सहजपणे तपासू शकता.
मोठी बातमी; पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक
जर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल, तर बँकेतून पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाइलवर येतो. त्यामुळे मोबाइलवरील बँकिंग संबंधित मेसेजेस तपासा.
तुमची बँकिंग अॅप्लिकेशन असल्यास, त्यामध्ये लॉग इन करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा. तेथे ‘PM-KISAN’ किंवा ‘DBT’ अशा नावाने ₹२००० चा क्रेडिट एंट्री दिसेल.
PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून तपासणी
https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा
‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा
नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका
कॅप्चा टाका आणि ‘Get Data’ क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, हप्त्याचा तपशील आणि पैसे जमा झालेत की नाही हे दिसेल
PM किसान सन्मान निधी योजनेतून पैसे जमा झालेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती वापरू शकता.
https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
मुख्य पानावर ‘Farmers Corner’ या विभागात जा.
‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
तिथे तुमचा आधार क्रमांक, बँक अकाउंट क्रमांक, किंवा नोंदणी क्रमांक यापैकी एक टाका.
खाली दिलेला कॅप्चा कोड भरून ‘Get Data’ वर क्लिक करा.
तुमचे नाव, हप्ता कोणता आहे, आणि पेमेंट स्टेटस (Payment Status) स्क्रीनवर दिसेल.