पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई NIAच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने केली आहे. 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यातील मुख्य आरोपी 7 ते 9 महिन्यापासून नाशिकमध्ये वेषांतर करून राहत असल्याची माहिती NIA ला मिळाली होती. त्यानुसार पश्चिम बंगालचे पथक मागील महिन्यात नाशिकमध्ये दाखल झाले होते. सातपूर MIDC परिसरात सतत दोन दिवस तपास करून नाशिक क्राईम ब्रँचच्या मदतीनें हि कारवाई करण्यात आली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने बनावट आधारकार्ड बनवून एका कंपनीत नोकरी मिळवली होती. बॉम्बस्फोटातील आरोपी नाशिकमध्ये वास्तव्यास कसा आला. त्याला स्थानिकांची मदत मिळाली होती का? या दृष्टीने तपास सुरू आहे. NIA कडून नाशिक पोलिसांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आल्याने पोलिसाची करवाई समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
अमरावती हादरलं! घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; शहरात खळबळ
दरम्यान, अमरावती शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुकृपा कॉलनी येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने अमरावती पोलीस दलात तसेच शहरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव आशा घुले (वय ३८) असे असून त्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. तर त्यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांची गळा दाबून हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे डीसीपी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आशा घुले यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आणि कोणत्या व्यक्तीने केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह तात्काळ पोस्टमार्टमसाठी पाठवला असून घटनास्थळी साक्षी-पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
मानवत हत्या प्रकरणातील आरोपीचा सापडला मृतदेह; हत्या की आत्महत्या? शोध सुरू