Pm modi inauguration of newly constructed flats for MPs in New Delhi political news
New Home to MPs : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी खासदार हे मतचोरीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. निवडणूक आयोगाविरोधात कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. इंडिया आघाडीमधील 300 हून अधिक खासदार हे मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे विरोधी खासदार मतचोरी आणि संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले असताना दुसरीकडे सत्ताधारी खासदारांनी खास घरांची सोय करण्यात आली आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बहुमजली इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम सकाळी ९:०० वाजता पार पडला. यामध्ये संसदेचे सभासदांना देखील घरे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही यावेळी उपस्थिती लावली. खासदार मनोज तिवारी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये गरिबांपासून खासदारांपर्यंत सर्वांना घर मिळत आहे. या उद्घटनामुळे विरोधक रस्त्यावर तर सत्ताधारी घरात अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या ईमारतीमधील प्रत्येक नवीन फ्लॅट सुमारे ५,००० चौरस फूट कार्पेट एरियामध्ये बांधला आहे. या फ्लॅट्सची रचना अशी आहे की खासदारांना त्यांच्या घरातून त्यांचे अधिकृत आणि सार्वजनिक काम सहजपणे करता येईल. या कॉम्प्लेक्समध्ये खासदारांचे निवासस्थान तसेच कार्यालये, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आणि एक सामुदायिक केंद्र समाविष्ट आहे. पायाभूत सुविधा आधुनिक मानकांनुसार तयार करण्यात आल्या आहेत. सर्व इमारती भूकंप प्रतिरोधक आहेत आणि त्यात आधुनिक संरचनात्मक सुरक्षा सुविधा आहेत. इमारतींची ताकदच नाही तर कॉम्प्लेक्सची सुरक्षा व्यवस्था देखील खूप मजबूत आहे. खासदारांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हे कॉम्प्लेक्स डिझाइन करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, हे कॉम्प्लेक्स अपंगांसाठी देखील अनुकूल आहे.
उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवासी संकुलात सिंदूराचे रोप देखील लावण्यात आले. यासोबतच, पंतप्रधानांनी तिथे काम करणाऱ्या कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
गरिबांपासून खासदारांपर्यंत सर्वांनाघर : मनोज तिवारी
या उद्घाटनापूर्वी खासदार मनोज तिवारी यांनी हा एक सुंदर दिवस असल्याचे कौतुकास्पद म्हटले. तिवारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गरिबांपासून खासदारांपर्यंत सर्वांना घर मिळत आहे. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनीही त्याचे कौतुक केले आणि सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांचे खूप चांगले निरीक्षण केले आहे. ही एक भव्य इमारत आहे आणि एक अद्भुत जागा आहे. येथे खासदार प्रभावीपणे काम करू शकतील. गृहनिर्माण समिती आणि पंतप्रधान मोदी यांचा हा एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी सदस्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह समिती आणि सर्व खासदारांचे अभिनंदन केले.
Speaking at the inauguration of newly constructed flats for MPs in New Delhi. https://t.co/tiKnnBqftH
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधी खासदार रस्त्यावर
निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये ‘सेव्ह व्होट’चे बॅनर्सच हाती घेतले होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानही दिली नाही. पोलिसांनी संसदेच्या आवारातच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखल्याने खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदारांनी आवारातच पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतलं. त्यामुळे दिल्लीमध्ये जोरदार राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून आले आहे.