PM Modi Meet Mohan Bhagwat: मागील आठ-दहा महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की आठ-दहा महिने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान आता लवकरच हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. कारण नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भेट झाल्यास भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
कोणाच्या नावाची चर्चा?
भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावाची चर्चा सुरु असल्याचे समोर आले आहे. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री तसेच संघटनेतील वरिष्ठ पदावरील नेतेमंडळी यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र शिवराज सिंह चौहान अध्यक्ष झाल्यास भाजपमधील जातीय समीकरण बिघडू शकते असे अनेकांचे म्हणणे असल्याचे समजते आहे. त्यामुळे शिवराज सिंह यांना ही संधी मिळणार का? हे पाहावे लागेल. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान संघाने शिवराज सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर मात्र भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ शिवराज सिंह चौहान यांच्यात गळ्यात पडू शकते.
अद्याप निर्णय नाही
सध्या भाजपने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. सी.पी. राधाकृष्णन हे ओबीसी प्रवर्गातून येत असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष देखील त्याच प्रवर्गातून आला तर अन्य समाज आणि जाती नाराज होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा भाजपमध्ये सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपमधील एका वर्गात भाजपचा अध्यक्ष हा युवा असावा असे मत असल्याचे म्हटले जात आहे. भाजपला आता पुढील १५ ते २० वर्षांचे नियोजन करून चावे लागेल त्यासाठी होणार अध्यक्ष हा युवा असे असे काहींचं म्हणणं असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन अध्यक्षांसमोर निवडणुकांचे आव्हान
या पदावर कोणताही नवा चेहरा आला, तरी त्याला काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाला २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकांपासून सुरू होणाऱ्या आगामी निवडणुकींचा सामना करावा लागेल. यानंतर २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुका त्यांच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहेत.