Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझ्या मित्राचे मनापासून अभिनंदन…; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोनाल्ड ट्रम्प यांना खास शुभेच्छा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 06, 2024 | 04:18 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : अमेरिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. अनेक महिन्यांच्या राजकारणानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. अमेरिकेची महासत्ता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आली आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर देशभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एक्सवर पोस्ट करुन नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प या माझ्या मित्राचे मनापासून अभिनंदन… तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, अशा शुभेच्छा व अभिनंदन नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

हे देखील वाचा : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प; डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव

अमेरिकेची निवडणूक ही संपूर्ण देशभरामध्ये बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशी होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिक पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये लढत होती. ही लढत चुरशीची होणार होती. अमेरिकेमध्ये मतदानही सुरळीतपणे पार पडले. या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सायंकाळी साडेपाचपासून सुरुवात झाली होती. इतकेच नाहीतर काही राज्यांमध्ये आज सकाळपर्यंत मतदानही सुरू होते. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय घोषित झाला आहे.

Heartiest congratulations my friend @realDonaldTrump on your historic election victory. As you build on the successes of your previous term, I look forward to renewing our collaboration to further strengthen the India-US Comprehensive Global and Strategic Partnership. Together,… pic.twitter.com/u5hKPeJ3SY — Narendra Modi (@narendramodi) November 6, 2024


हे देखील वाचा : जगातील ‘या ठिकाणी पोहोचून तुम्ही अमर होऊ शकता; इथे चक्क वय वाढायचे थांबते

 

विजयानंतर व्यक्त केल्या भावना

डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की,  देशाला मजबूत करण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे. आमचा देशामध्ये आता बदलाची आणि सुधारण्याची गरज  आहे. सीमांचे संरक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, आणि राष्ट्रीय हिताची भावना पुन्हा जागृत करण्याचा संकल्प व्यक्त केला. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी उद्योगपती एलोन मस्क यांचे आभार मानले. निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि आर्थिक मदतीबद्दल त्यांनी मस्क यांचे कौतुक केले. मस्क यांनीही ट्रम्प यांना उत्साहाने पाठिंबा दिला होता.

 

Web Title: Pm narendra modi congratulated donald trump after the us election results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Kamla harris
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी
1

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
2

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…
3

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
4

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.