File Photo : Donald Trump
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी मंगळवारी (दि.5) मतदान झाले होते. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रामुख्याने लढत पाहिला मिळाली. आता या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे.
हेदेखील वाचा : US Election : एकीकडे मतदान तर दुसरीकडे मतमोजणी सुरू; कमला हॅरिस, ट्रम्प यांच्यात काट्याची टक्कर
अमेरिकेची निवडणूक ही बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशी होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानही सुरळीतपणे पार पडले. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहिला मिळाली. या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सायंकाळी साडेपाचपासून मतदानाला सुरुवात झाली होती. इतकेच नाहीतर काही राज्यांमध्ये आज सकाळपर्यंत मतदानही सुरू होते.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत पाहिला मिळाली. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यात इंडियाना आणि केंटकी राज्यांच्या काही भागांमध्ये 6 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 4.30 वाजता मतमोजणी सुरू झाली. यानंतर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी मतमोजणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनामध्ये संपले मतदान
जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या स्विंग राज्यांमध्ये मतदान संपले आहे. सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर आघाडी मिळत असल्याचे दिसत होते. मात्र, नंतर या निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. ट्रम्प आता विजयी झाल्याने ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. यापूर्वीही ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आता ते पुन्हा विजयी झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना 277 इलेक्टोरल मतं
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना 277 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : एकीकडे मतदान तर दुसरीकडे मतमोजणी सुरू; कमला हॅरिस, ट्रम्प यांच्यात काट्याची टक्कर