Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: “काही लोकं संसदेत नवीन खासदारांचा…”; पंतप्रधान मोदींचा ‘इंडिया’आघाडीवर निशाणा

Winter Session 2024: दरम्यान आज सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.  तासाभराच्या अधिवेशनामध्ये मोठा राडा झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 25, 2024 | 02:28 PM
PM Narendra Modi: “काही लोकं संसदेत नवीन खासदारांचा…”; पंतप्रधान मोदींचा ‘इंडिया’आघाडीवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्रात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसून येत आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते आहे. दरम्यान आजपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, “आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण 16 विधेयक सादर करण्यात येणार आहेत. या हिवाळी अधिवेशनात सर्व खासदारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. काही लोक नवीन खासदारांचा आवाज दाबून टाकण्याचे काम करतात. मागच्या पिढीने लोकशाहीत नवीन पिढी तयार करायची असते. काही जण संसदेचे काम चालू नये यासाठी प्रयत्न करत असतात.”

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान सरकारला अधिक ताकद दिली आहे. संसदेत अनेक विषयांवर चर्चा करणे आवश्यक असते. सखोल विश्लेषण करणे आवश्यक असते. जगात भारताचे आकर्षण वाढले आहे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. संसदेतून विश्वाला एक चांगला संदेश मिळाला पाहिजे.”

As the Winter Session of the Parliament commences, I hope it is productive and filled with constructive debates and discussions.https://t.co/X6pmcxocYi

— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2024

दरम्यान आज सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.  तासाभराच्या अधिवेशनामध्ये मोठा राडा झाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे मोठा गदारोळ झाला. यावरुन लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका मशीदीच्या मुदद्यांवरुन हा वाद सुरु झाला आहे. संभलमधील मशीदीचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी दोन गटामध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी ट्वीट केले. आणि हाच मुद्दा विरोधकांनी संसदेमध्ये उचलून धरला. यामुळे विरोधी व सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला. या हिंसाचार प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.

हेही वाचा: Winter session adjourned : राहुल गांधींचं एक ट्वीट अन् अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित; संसदेत पहिल्याच दिवशी जोरदार राडा

काय आहे राहुल गांधींचे ट्वीट?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर या संभल मशीद सर्वेक्षण प्रकरणातील मृत्यूंवर भाष्य केले. राहुल गांधींनी लिहिले की, उत्तर प्रदेशातील संभल येथे नुकत्याच झालेल्या वादावर राज्य सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना.

पुढे लिहिले आहे की, सर्व संबंधितांचे न ऐकता प्रशासनाने केलेल्या असंवेदनशील आणि असंवेदनशील कृतीमुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला – ज्याला भाजप सरकार थेट जबाबदार आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी भाजपचा सत्तेचा वापर राज्याच्या किंवा देशाच्या हिताचा नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा. शांतता आणि परस्पर सौहार्द राखण्याचे माझे आवाहन आहे. जातीयवाद आणि द्वेष न करता भारत एकता आणि संविधानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमधून केले आहे.

Web Title: Pm narendra modi criticizes to india alliance about winter session 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
4

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.