Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या ‘वंदे भारत मेट्रो’ला दाखवणार हिरवा झेंडा; स्पीडमध्ये तर सुपरफास्टच…

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी झारखंडमध्ये 6 नवीन 'वंदे भारत ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवला. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांनी जमशेदपूर दौरा रद्द केला होता. हा दौरा रद्द करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रांची विमानतळावरूनच ऑनलाईन माध्यमातून विविध योजनांचे उद्घाटन केले. या पावसामुळे जमशेदपूरमधील रोड शोही रद्द करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2024 | 10:55 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या 'वंदे भारत मेट्रो'ला दाखवणार हिरवा झेंडा; स्पीडमध्ये तर सुपरफास्टच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या 'वंदे भारत मेट्रो'ला दाखवणार हिरवा झेंडा; स्पीडमध्ये तर सुपरफास्टच...

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : देशात आज पहिल्यांदाच ‘वंदे भारत मेट्रो’ ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’ ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही नवी वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद ते भुज दरम्यान धावणार आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील इतर शहरांमध्ये धावणाऱ्या मेट्रो ट्रेनप्रमाणे या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. मात्र, स्पीडमध्ये तर ही ट्रेन सर्वात सुपरफास्ट असणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी झारखंडमध्ये 6 नवीन ‘वंदे भारत ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखवला. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांनी जमशेदपूर दौरा रद्द केला होता. हा दौरा रद्द करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रांची विमानतळावरूनच ऑनलाईन माध्यमातून विविध योजनांचे उद्घाटन केले. या पावसामुळे जमशेदपूरमधील रोड शोही रद्द करण्यात आला. दरम्यान, झारखंडच्या जलद विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. मोदींनी झारखंडमध्ये सहा वंदे भारत ट्रेनला सुरुवात करण्याशिवाय 21 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली.

भारतीय रेल्वेने विकसित केलेली वंदे भारत मेट्रो ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन असणार आहे. ही ट्रेन 100 ते 250 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना आरामात बसण्यासाठी या ट्रेनमध्ये तीन-तीन बेंच-प्रकारची आसन सुविधा देण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांचीही काळजी घेण्यात आली आहे, त्यांच्यासाठी डब्यात व्हिलचेअर शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल

रेल्वेने ‘वंदे भारत मेट्रो’मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत टॉक-बँक सिस्टम उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेन चालकाशी बोलू शकतात. प्रत्येक डब्यात एकूण 14 सेन्सर यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.

Web Title: Pm narendra modi will flag off the new vande bharat metro today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Vande Bharat Metro

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
4

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.