वर्धा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तब्बल 11 गाड्यांमध्ये अपघात झाल्याची घटना समोर आली होती. आता सध्या नागपूरमधून अपघाताची बातमी समोर आली आहे. परभणी येथून आरोपी घेऊन नागपूरला येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. (Police vehicle Accident) हरियाणा राज्यातील पंचकुला येथील हे पोलिसांचं वाहन असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एका महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे तर तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाला आहे.
[read_also content=”गेल्या 24 तासात देशात 7,171 कोरोना रुग्णांची नोंद; 40 जणांचा मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या 67,556 वर https://www.navarashtra.com/latest-news/in-last-24-hours-7171-new-cases-recorded-in-india-and-40-people-died-nrps-392809.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, हरीयाणा येथील पंचकुला पोलीस (Police) ठाण्यातील पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून एका गुन्ह्यातील आरोपीला घेऊन पोलीस वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा येथे त्यांच्या वाहनाने ट्रकला मागून धडकले. या अपघाता पोलीस वाहनाचा समोरील भाग अक्षरश: चेंदामेंदा झाला. पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन पोलीस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. दरम्यान सावंगी पोलीसांनी अपघातस्थळी येत तसेच सर्व जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.