पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये नजरचुकीने बॉर्डर क्रॉस करणाऱ्या बीएसएफ जवान पूर्णम शॉ यांना पाकिस्तान रेंजर्सच्या जाळ्यात अडकले होते. पूर्णम शॉ जवळपास २० दिवस पाकिस्तानच्या कैदेत होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, २३ एप्रिल ते १४ मे पर्यंत पाकिस्तानच्या कैदेत असलेले बीएसएफ जवान पूर्णम शॉ अटारी-वाघा बॉर्डरमधून बुधवारी भारतात परतले. पाकिस्तानकडून त्यांचा एक फोटोही व्हायरल करण्यात आला होता. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी रेंजर्सने शॉ यांना शिवीगाळ तर केलीच पण मानसिक छळही केला. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धविरामानंतर शॉ यांना पुन्हा भारताच्या स्वाधीन कऱण्यात आले. भारतात परतल्यानंतर शॉ यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असताना घडलेली आपबीती सांगितली आहे.
एका वृत्तवाहिनीने पूर्णम शॉ यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सने त्यांच्या डोळ्यांवर सतत पट्टी बांधून ठेवली होती. ज्या ज्या ठिकाणी त्यांना नेण्यात आले, तिथेही डोळ्यांवर पट्टीच ठेवण्यात आली होती. शारीरिक त्रास दिला गेला नाही, मात्र बीएसएफच्या तैनातीविषयी त्यांच्याकडून चौकशी केली गेली. तसेच, त्यांना ब्रश करण्याची परवानगीही दिली गेली नाही. कैदेत असताना पूर्णम शॉ यांना पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते. त्यापैकी एक ठिकाण विमानतळाजवळील एअरबेस होते, जिथून विमानांच्या आवाजाही ऐकू येत होत्या.
पूर्णम शॉला एका ठिकाणी तुरुंगाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशी करणारे लोक साध्या कपड्यांत होते. या वेळी त्यांच्याकडून बीएसएफच्या तैनातीविषयी प्रश्न विचारण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय सीमेला तैनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहितीही मागितली गेली. त्यांच्याकडून संपर्क क्रमांक देण्यासही दबाव टाकण्यात आला, मात्र शॉंकडे त्या वेळी मोबाईल फोन नव्हता, त्यामुळे ते नंबर देऊ शकले नाहीत. पूर्णम कुमार शॉच्या पकडल्या गेल्यावर भारताने ऑपरेशन सिंदूर केले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सैनिकी संघर्षही झाला. त्या काळात शॉच्या परतीची आशाही कमी होत चालली होती, पण नंतर सिजफायरनंतर त्याची भारतात परत येण्याची खात्री मिळाली.
समांथा प्रभूचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट…