Samantha Ruth Prabhu Rumored Boy Friend Is Married Has A Daughter And Is Not Divorced From His Wife
टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता नागार्जुनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून समांथा प्रसिद्ध टॉलिवूड दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्रीने अलीकडेच राजसोबत एक सेल्फी शेअर केली आहे. समांथाने आपल्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत खास अंदाजात सेल्फी शेअर केली आहे. या कपल गोलने शेअर केलेली सेल्फी पाहून, नेटकऱ्यांमध्ये अभिनेत्री राज निदिमोरुसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोलले जात आहे.
समांथाने राजसोबत फोटो शेअर केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर दोघांच्याही प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने आपल्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर चाहते कमालीचे खुश झाले आहेत. पण ज्या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये पुढे जाणार आहे तो आधीच विवाहित आहे. हे कळल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. राजने २०१५ मध्ये श्यामली डेसोबत लग्न केले होते. रिपोर्ट्सनुसार, त्याला एक मुलगी आहे. सध्या सोशल मीडियावर राज निदिमोरु आणि श्यामली डेच्या लग्नाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी बंगाली पद्धतीने पारंपारिक पद्धतीने केलेले दिसत आहे.
राजने अद्याप श्यामलीशी घटस्फोट घेतलेला नाही तोच तो समांथाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडताना दिसत आहे. राज आणि श्यामलीबद्दल काही चाहते असा दावा करताना दिसत आहेत की, राज विवाहित असून त्याला अद्यापही मुलगी नाही. आता हे किती खरे आहे हे फक्त राजच सांगू शकतो. समांथा रूथ प्रभूने टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्यासोबत ऑक्टोबर २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. परंतु चार वर्षांनी अर्थात २०२१ मध्ये त्यांचे लग्न तुटले. यानंतर काही काळानंतर, नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले. सध्या दोघांचाही सुखाचा संसार सुरु असून ते आपआपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.