नवी दिल्ली : सध्या राजधानी दिल्लीत (Heat Wave in Delhi) प्रचंड उष्णता जाणवत आहे. त्यात हवामान खात्याने 6 आणि 7 जून रोजी वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात ढगांची हालचाल सुरू राहील. हवामान विभागानुसार, गाझियाबादचे कमाल तापमान या संपूर्ण आठवड्यात 38 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 7 जूनपर्यंत दिल्लीत ढग असतील आणि त्यादरम्यान वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत सध्या प्रचंड उष्णता आहे. ढगांच्या हालचालींमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे. परंतु, तरीही उष्णता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 5 जून ते 7 जूनपर्यंत दिल्लीत ढग असतील आणि त्यादरम्यान वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, संपूर्ण आठवड्यात दिल्लीत कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 6 जून रोजी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.