Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VB-G RAM G : मोदी सरकारचा निर्धार पूर्ण! जी राम जी विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजूरी

व्हीबी-जी राम-जी विधेयक, २०२५ ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेमुळे मनरेगाची जागा आता जी राम जी ने घेतली आहे. जी राम-जी विधेयकाचे रुपांतर कायद्यामध्ये झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 22, 2025 | 02:04 PM
President Draupadi Murmu signed and approved the VB-G RAM G Scheme

President Draupadi Murmu signed and approved the VB-G RAM G Scheme

Follow Us
Close
Follow Us:
  • जी राम-जी विधेयकाचे रुपांतर कायद्यामध्ये झाले
  • VB-G RAM G विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
  • दोन्ही सभागृहानंतर आता राष्ट्रपतींचीही मान्यता
VB-G RAM G  Bill approved : नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी विकासित भारत जी राम जी विधेयक, २०२५ ला मंजुरी दिली आहे. सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ऐवजी विकासित भारत रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) किंवा व्हीबी-जी राम-जी विधेयक, २०२५ ला मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेमुळे मनरेगाची जागा आता जी राम जी ने घेतली आहे. जी राम-जी विधेयकाचे रुपांतर कायद्यामध्ये झाले.

यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) जी राम जी विधेयकावरुन जोरदार वादंग निर्माण झाला. यापूर्वी असलेल्या मनरेगा या योजनेमध्ये काही सुधार करुन या योजनेचे नाव बदलण्यात आले. मनरेगामध्ये असणाऱ्या महात्मा गांधींचे नाव हटवण्यात आले. त्याऐवजी नावामध्ये राम जी नाव घालण्यात आले आहे. यावरुन नाराज असलेल्या कॉंग्रेसने राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जोरदार खडाजंगी केली. पहिल्यांदा हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले. यानंतर विधेयक राज्यसभेमध्ये देखील मंजूर झाले. राज्यसभेत या विधेयकावर सहा तास चर्चा झाली. कृषीमंत्र्यांच्या उत्तरानंतर ते आवाजी मतदानाने मंजूर झाले. अनेक दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आल्या, परंतु सभागृहाने त्या फेटाळून लावल्या आहेत.

विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण, म्हणजे जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागतल्या प्रत्येक कुटुंबात १२५ दिवसांच्या रोजगार देणार आहे. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता, समृद्धी , सर्वसमावेशक विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्टं आहेत. हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल असं ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या २०४७ च्या व्हिजनवर आधारित

जी रामजी विधेयक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या २०४७ च्या व्हिजनशी सुसंगत आहे. ग्रामीण भागात रोजगार, उपजीविका आणि कृषी उत्पादकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ते वार्षिक रोजगार हमी १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढवते. स्थानिक नियोजन, कामगार संरक्षण आणि योजनांचे एकत्रीकरण यावर भर दिला जातो. आघाडीच्या योजना एकत्रित करून आणि कृषी रोजगार संतुलित करून ग्रामीण उत्पन्न सुरक्षा मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सरकारचे म्हणणे आहे की हा कायदा ग्रामीण भागात वेतन रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देईल आणि पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक संसाधनांचा चांगला वापर यावर देखील लक्ष केंद्रित करेल.

Web Title: President draupadi murmu signed and approved the vb g ram g scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • MGNREGA
  • parliament winter session 2025

संबंधित बातम्या

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
1

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

MGNREGA Name Change : महात्मा गांधी आणि बापूंसोबत नाही राहिला आता संबंध; मनरेगा आता झाले राम नाम
2

MGNREGA Name Change : महात्मा गांधी आणि बापूंसोबत नाही राहिला आता संबंध; मनरेगा आता झाले राम नाम

VB-G RAM-G Bill passed : लोकसभा आहे की कुस्तीचा आखाडा? VB-G RAM-G बिल पास होताच खासदारांनी केली फेकाफेकी
3

VB-G RAM-G Bill passed : लोकसभा आहे की कुस्तीचा आखाडा? VB-G RAM-G बिल पास होताच खासदारांनी केली फेकाफेकी

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल
4

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.