मोदी सरकार मनरेगा असे नाव बदलून नवीन नावासोबतच योजनेत काही महत्त्वाचे बदलही करत आहे. केवळ कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्यात आली नाही तर शेतकऱ्यांच्या विकासाचा ही विचार करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा विचार करत आहे. यावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली असून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.
लोकसभेत १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देणारे विधेयक मांडले जात आहे. या योजनेचे पूर्ण नाव विकासित भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) असेल. याला 'व्हीबी-जी राम जी' योजना असेही…