Priyanka gandhi reaction on supreme court rahul gandhi Criticism
Priyanka Gandhi on SC : नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सुप्रीम कोर्टाने जोरदार निशाणा साधला. खासदार राहुल गांधी यांनी चीनने जमीन बळकली असल्याचा गंभीर दावा केला होता. राहुल गांधी यांनी सैन्य आणि चीनबद्दल केलेल्या कथित विधानाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आक्रमक पवित्रा घेत टिप्पणी केली. न्यायालयाने राहुल गांधींना प्रश्न विचारला होता आणि म्हटले होते की, “जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असे म्हटले नसते. असे कोर्टकडून टिप्पणी करण्यात आली. यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर देत कोण खरे भारतीय हे ठरवण्याचे काम कोर्टाचे नसल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींची बाजू मांडत कोर्टाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की मी न्यायव्यवस्थेचा पूर्ण आदर करते, परंतु कोण खरा भारतीय आहे हे ठरवणे न्यायालयाचे अधिकार क्षेत्र नाही. कोण खरा भारतीय आहे आणि कोण नाही हे न्यायव्यवस्था ठरवणार नाही. ते त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही.” असा आक्रमक पवित्रा प्रियांका गांधी यांनी घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधी यांनी लष्कर आणि चीनच्या मुद्द्यावर दिलेल्या विधानाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले आहे. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या विधानावर कडक टिप्पणी केली होती. खासदार प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले की त्यांचे भाऊ राहुल गांधी यांना सैन्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्यांनी कधीही सैन्याविरुद्ध कोणतेही विधान केलेले नाही. प्रियंका म्हणाल्या, “राहुल कधीही सैन्याविरुद्ध बोलणार नाहीत, त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. जे काही बोलले गेले त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.” अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी घेतली आहे.
प्रियंका गांधी यांचे हे विधान न्यायव्यवस्थेवर विरोधकांकडून दररोज उपस्थित केल्या जाणाऱ्या तीक्ष्ण प्रश्नांना आणखी एक सौम्य पण जोरदार उत्तर म्हणून पाहिले जात आहे. न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा आदर करत त्यांनी स्पष्ट केले की देशभक्ती आणि खरा भारतीय असणे हे कोणत्याही एका संस्थेच्या मताने मूल्यांकन केले जाऊ शकत नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
३ आठवड्यांनंतर सुनावणीसाठी वेळ निश्चित केली
राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि तक्रारदाराला नोटीस बजावली आहे आणि राहुल गांधींना सध्यासाठी दिलासा दिला आहे. त्याच वेळी, कनिष्ठ न्यायालयात मानहानीच्या खटल्याच्या कामकाजाला स्थगिती देण्यात आली आहे आणि ३ आठवड्यांनंतर सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांशी असहमती व्यक्त केली. न्यायमूर्ती दत्ता यांनी विचारले, ‘तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते तुम्ही संसदेत का म्हणत नाही.. तुम्हाला हे सर्व सोशल मीडिया पोस्टमध्ये का म्हणायचे आहे..?’ असा सवाल कोर्टाने राहुल गांधींबाबत उपस्थित केला आहे.