Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन प्रस्थापित झालेले शरीरसंबंध म्हणजे फसवणूक नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय नुकताच रद्द केला. त्यामध्ये एका व्यक्तीने घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2023 | 06:21 PM
Court Decision

Court Decision

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय नुकताच रद्द केला. त्यामध्ये एका व्यक्तीने घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. पण कोलकाता उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन प्रस्थापित झालेले शरीरसंबंध म्हणजे फसवणूक नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले की, एखाद्या व्यक्तीने पहिल्या विवाहाच्या घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन एखाद्या स्त्रीशी शरीरसंबंध प्रस्थापित केले असेल तर त्या व्यक्तीविरोधात फसवणूक झाल्याचा आरोप करता येणार नाही. कारण ज्या महिलेसोबत त्याने संबंध प्रस्थापित केले होते. त्या महिलेने भविष्यातील अनिश्चितता जाणून त्याला संमती दिली होती. म्हणून त्या व्यक्तीला दोष देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

एका महिलेने आरोपीविरोधात तक्रार देत खटला दाखल केला की, लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आरोपीला दोषी ठरवून 10 लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. यातील 2 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून पीडितेला आणि 8 लाख रुपये त्याच्या शिक्षेचा भाग म्हणून राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावयाचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात आरोपीने वरच्या कोलकाता उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Web Title: Promise of marriage after divorce by itself does not amount to cheating says calcutta high court nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2023 | 06:21 PM

Topics:  

  • Calcutta High Court
  • Court Decision
  • High court

संबंधित बातम्या

Pakistan Blast In Car : पाकिस्तानची राजधानी स्फोटाने हादरली; उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू
1

Pakistan Blast In Car : पाकिस्तानची राजधानी स्फोटाने हादरली; उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.