mumbai terror attack
नवी दिल्ली -भारत आणि परदेशातील भारतीय समुदायाने २६/११ च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. सोबतच परदेशातील पाकिस्तानी दूतावासांबाहेरही निदर्शने केली.
वास्तविक, २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री लष्कर-ए-तैयबाच्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतातील मुंबईतील ताज हॉटेलसह ४ ठिकाणी हल्ला केला होता. या हल्ल्यात १६० हून अधिक लोक मारले गेले, त्यात २६ परदेशी नागरीक होते. तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर लोकांनी निदर्शने केली. यावेळी उपस्थित लोकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. न्यू जर्सी येथील पाकिस्तान कम्युनिटी सेंटर, ह्युस्टन येथे आणि शिकागो येथील पाकिस्तान वाणिज्य दूतावासासमोर निदर्शनेही झाली. तसेच जपानची राजधानी टोकियो येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर लोकांनी निदर्शने केली. येथेही लोकांनी पाकिस्तान आणि दहशतवादाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
एका आंदोलकाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे पाकिस्तानविरोधात आवाज उठवण्याची मागणी केली. दहशतवादाला कॅन्सर असे वर्णन करताना तो म्हणाले – आतापर्यंत जगात जे काही दहशतवादी हल्ले झाले आहेत त्यांचा एक ना एक प्रकारे पाकिस्तानशी संबंध आहे.