Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devgadh News: एका तलाठ्यावर १० गावांचा डोंगर! देवगड महसूल प्रशासनाचा कारभार ‘रामभरोसे’

मोंड येथील मूळ सज्जावर मे २०२५ पासून तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोंड, मोंडपार, मळेगाव आणि चिंचवाड ही मूळ गावे असतानाच, मागील वर्षभरापासून बापर्डे व जुवेश्वरचा पदभार देण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 27, 2026 | 04:48 PM
Devgad Revenue Department, Talathi Workload Issues,

Devgad Revenue Department, Talathi Workload Issues,

Follow Us
Follow Us:
  • देवगड महसूल विभागात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.
  • महसूल कामकाजासाठी नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत
  • रिक्त पदांमुळे रिक्त असलेल्या सजांचा (तलाठी मुख्यालय) कारभार शेजारील तलाठ्यांकडे सोपवून वेळ मारून नेली जात आहे
Devgadh News: देवगड तालुक्यातील महसूली प्रशासनाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मोंड सज्जाच्या तलाठ्यांकडे तब्बल १० गावांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच येत्या ४ दिवसांत मार्ग न निघाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

मोंड येथील मूळ सज्जावर मे २०२५ पासून तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोंड, मोंडपार, मळेगाव आणि चिंचवाड ही मूळ गावे असतानाच, मागील वर्षभरापासून बापर्डे व जुवेश्वरचा पदभार देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०२१ पासून गढीताम्हाणे आणि रहाटेश्वर या सज्जांचा भारही त्यांच्याकडेच आहे. त्यातच आता मागील ३ महिन्यांपासून वानिवडे आणि पावणाई या गावांचीही जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

 

मूलभूत साधनांची कमतरता; नेटवर्कचा व्यत्यय

१० गावातील नागरिकांना कामासाठी मोंड येथे चकरा माराव्या लागतात, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे. तलाठ्यांकडे लॅपटॉप आणि प्रिंटर यांसारख्या मूलभूत साधनांची कमतरता आहे.

गढीताम्हाणे, रहाटेश्वर, वानिवडे आणि पावणाई या भागात नेटवर्क नसल्याने ऑनलाईन कामे ठप्प आहेत. राउटर वापरूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावोगावी फिरताना नागरिकांनी या समस्यांचा पाढा साळसकर यांच्यासमोर वाचला. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी आणि सामान्य जनता भरडली जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Maharashtra Politics : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा

तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा

या समस्यांवर येत्या ८ दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढून प्रशासनाने लेखी अहवाल सादर करावा. जर येत्या ४ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर १० गावातील ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिला आहे. यामुळे आता महसूल विभाग काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: A mountain of 10 villages on one talathi the administration of devgad revenue is dependent on god

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Kokan News
  • Kokan Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.