Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rafale AirCraft : मोठी बातमी! राफेल विमानं आता भारत स्वत: बनवणार, या कंपनीशी करार

भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे. हैदराबादमध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन एकत्रित उत्पादन बनवणार आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 05, 2025 | 05:50 PM
मोठी बातमी! राफेल विमानं आता भारत स्वत: बनवणार, या कंपनीशी करार

मोठी बातमी! राफेल विमानं आता भारत स्वत: बनवणार, या कंपनीशी करार

Follow Us
Close
Follow Us:

भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे. हैदराबादमध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन एकत्रित उत्पादन बनवणार आहेत. २०२७-२८ पासून प्रतिमहिना दोन फ्युझलाज तयार होण्याची शक्यता आहे. या करारानंतर भारताच्या संरक्षण आणि अवकाश उत्पादन क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या एका ऐतिहासिक टप्प्याची नोंद झाली आहे.

Indigo Airline : अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने

फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड सोबत भागीदारी करत राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत फ्रान्सनंतर राफेल फ्युझलाज उत्पादन करणारा पहिला देश ठरणार आहे. या अंतर्गत, टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारणार असून त्यामध्ये राफेल विमानाच्या मागील भागाचे लेटरल शेल्स, पूर्ण रिअर सेक्शन, मध्यभागी फ्युझलाज आणि पुढचा भाग तयार केला जाणार आहे. हे केंद्र २०२७-२८ या आर्थिक वर्षात पहिले फ्युझलाज तयार करेल, अशी अपेक्षा आहे. दर महिन्याला दोन संपूर्ण फ्युझलाज तयार करण्याची क्षमता या केंद्राची असेल.

उत्पादन केंद्र केवळ भारतीय हवाई दलासाठीच नव्हे, तर राफेलच्या आंतरराष्ट्रीय मागणीसुद्धा पूर्ण करेल. सध्या भारताकडे ३६ राफेल लढाऊ विमाने आहेत आणि २०३० पर्यंत भारतीय नौदलासाठी २६ राफेल मेरीन जेट्स खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी ६३,००० कोटी रुपयांचा करार भारत आणि फ्रान्समध्ये एप्रिल २०२५ मध्ये झाला आहे. या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देखभाल व उत्पादन केंद्र उभारण्याच्या बाबतीतही तरतुदी आहेत.

फ्रान्स आणि भारताव्यतिरिक्त राफेल लढाऊ विमाने इजिप्त, कतार, युएई, ग्रीस, इंडोनेशिया, क्रोएशिया आणि सर्बिया या देशांमध्ये वापरली जात आहेत किंवा ऑर्डर दिली आहे. या उत्पादन केंद्रासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स यांच्यात चार वेगवेगळ्या उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून, भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर म्हणाले, “फ्रान्सबाहेर प्रथमच राफेलचे फ्युझलाज भारतात तयार होणार आहेत. टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्ससह आमच्या भागीदारांच्या मदतीने ही आपली पुरवठा साखळी बळकट होईल.”

CDS Anil Chauhan : पाकिस्तानचा ४८ तासांचा होता प्लान, भारतीय सैन्याने ८ तासांत चारली धूळ : CDS अनिल चौहान

टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्सचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग यांनी म्हटले की, “राफेल फ्युझलाजचे संपूर्ण उत्पादन भारतात होणे हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. या भागीदारीतून भारताने तयार केलेल्या मजबूत आणि आधुनिक एरोस्पेस उत्पादन प्रणालीवर विश्वास परावर्तित होतो.”‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना चालना देण्यासाठी या कराराचा मोठा वाटा असून भारताला जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत एक महत्त्वाचा भागीदार बनवण्याचे उद्दिष्ट या भागीदारीमागे असल्याचे डसॉल्ट आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्सने म्हटले आहे.

Web Title: Rafale fighter aircraft fuselages first time made in india agreement between tata advanced systems and dassault aviation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Dassault Rafale
  • Indian Air Force
  • indian army

संबंधित बातम्या

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश
1

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश

चेहऱ्यावर हास्य अन् आत्मविश्वास; Tejas पायलट नमांश स्याल यांचा मृत्यूपूर्वीचा VIDEO आला समोर
2

चेहऱ्यावर हास्य अन् आत्मविश्वास; Tejas पायलट नमांश स्याल यांचा मृत्यूपूर्वीचा VIDEO आला समोर

Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
3

Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’
4

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.